Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story | बालपणीच्या खेळांसह मृत्यूचा फेरा, तरीही लोकांच्या पसंतीस उतरतेय ‘स्क्विड गेम’! जाणून घ्या नेमकी कथा…

दक्षिण कोरियाचा नेटफ्लिक्स ओरिजिनल ड्रामा ‘स्क्विड गेम’ (squid game) जागतिक स्तरावर लोकप्रिय झाला आहे. 17 सप्टेंबर रोजी रिलीज झालेली ही वेब सीरीज अवघ्या दोन आठवड्यांत नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिली जाणारी सीरीज बनली. अखेर या लहान मुलांच्या खेळावर आधारित या वेब सीरीजमध्ये असे काय आहे की, अवघ्या जगाला त्याची चटक लागली आहे, चला तर जाणून घेऊया या सीरीजची नेमकी कथा काय आणि या क्रूर खेळला लोकांची का पसंती मिळत आहे....

Special Story | बालपणीच्या खेळांसह मृत्यूचा फेरा, तरीही लोकांच्या पसंतीस उतरतेय ‘स्क्विड गेम’! जाणून घ्या नेमकी कथा...
Squide Game
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 6:07 PM

मुंबई : दक्षिण कोरियाचा नेटफ्लिक्स ओरिजिनल ड्रामा ‘स्क्विड गेम’ (squid game) जागतिक स्तरावर लोकप्रिय झाला आहे. 17 सप्टेंबर रोजी रिलीज झालेली ही वेब सीरीज अवघ्या दोन आठवड्यांत नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिली जाणारी सीरीज बनली. अखेर या लहान मुलांच्या खेळावर आधारित या वेब सीरीजमध्ये असे काय आहे की, अवघ्या जगाला त्याची चटक लागली आहे, चला तर जाणून घेऊया या सीरीजची नेमकी कथा काय आणि या क्रूर खेळला लोकांची का पसंती मिळत आहे….

दक्षिण कोरियाचे दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युक यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘स्क्विड गेम’ या वेब सीरीजमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एकूण 456 लोकांसह खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेची कथा यात दाखवण्यात आली आहे. हे सर्व लोक कर्जातून बाहेर पडण्यासाठी एका खेळाचा भाग बनतात, ज्यामध्ये त्यांना लहान मुलांचे काही खेळ खेळावे लागतात. जर कोणी हा गेम जिंकला तर त्याला 45.6 अब्ज दक्षिण कोरियन वॉन (सुमारे 300 कोटी रुपये) मिळतील. पण या खेळात एक मोठा ट्विस्ट आहे, पण या लोकांना त्याबद्दल कल्पनाच नाहीये…

‘हा’ आहे सर्वात मोठा ट्विस्ट!

जो व्यक्ती खेळातून बाहेर पडेल त्याला खेळाचा निरोप तर घ्यावा लागेलच, पण त्याला या जगाचाही निरोप घ्यावा लागेल, असा एक मोठा ट्विस्ट आहे. होय, या गेममध्ये एलिमिनेशन म्हणजे आपला जीव गमावणे हा नियम आहे. एकदा का व्यक्तीने या गेममध्ये प्रवेश केला की, त्याला परत जाण्याचा किंवा मागे फिरण्याचा कोणताही मार्ग नाही!

नऊ भागांत 6 जीवघेणे खेळ

‘स्क्विड गेम’ वेब सीरीजमध्ये एकूण नऊ भाग आहेत, ज्यामध्ये 6 जीवघेणे खेळ आहेत. यातील पहिला खेळ म्हणजे ‘रेड लाईट ग्रीन लाईट’ ज्याला आपण भारतात ‘स्टॅच्यू गेम’ म्हणून ओळखतो. पहिल्याच खेळत तबल अर्ध्याहून अधिक लोकांना अर्थात स्पर्धकांना आपला जीव गमवावा लागतो. दुसरा ‘द मॅन विथ द अंब्रेला’ या खेळामध्ये स्पर्धकांना साखरेच्या पाकापासून बनवलेली कँडी दिली जाते, ज्यावर एक आकार असतो तो कोरून बाहेर काढायचा असतो.

तिसरा ‘टग ऑफ वॉर्स’ अर्थात रस्सी खेचाची स्पर्धा, चौथा गगनबू  अर्थात गोट्यांचा खेळ, पाचवा ग्लास स्टेपिंग स्टोन्स ज्यामध्ये खेळाडूला काचेचा पूल ओलांडून पलीकडे जावे लागते. सहावा आणि शेवटचा गेम म्हणजे स्क्विड गेम ज्यामध्ये दोन स्पर्धकाला अंतिम रेषेपर्यंत जाण्यापासून दुसऱ्याला अडवायचे असते.

वरील पहिल्या पाच गेममध्ये, खेळाडू एकमेकांशी कोणत्याही प्रकारचे हिंसक वर्तन करू शकत नाहीत. खरं तर अशी कोणतीही संधी या खेळात नसते, परंतु स्क्विड गेममध्ये असे नाही. या गेममध्ये खेळाडू गेम जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. कथेच्या सुरुवातीला या खेळाबद्दल थोडीशी सूचनाही दिली आहे.

येथे प्रत्येकजण असहाय्य आहे!

या मालिकेत ली जंग-जे मुख्य भूमिकेत आहे. त्याने ड्रायव्हर आणि जुगाराच्या व्यसनाधीन असलेल्या एका व्यक्तीची भूमिका साकारली आहे. ली हा घटस्फोटित माणूस आहे, जो आपल्या आईसोबत राहतो. तिला एक मुलगी आहे, जी आई आणि सावत्र वडिलांसोबत राहते. ली याच्यावर लाखो रुपयांचे कर्ज आहे. इतकं की, त्याच्याकडे आईच्या उपचारासाठीही पैसे नाहीत. यामुळे ली हा गेम खेळण्यास लगेच राजी होतो. ली आणि इतर काही जण खेळ सोडून परत आले असले, तरी कर्जाचा बोजा त्यांना खेळात परतण्यास भाग पाडतो.

भारतीय अभिनेत्याचीही महत्त्वाची भूमिका!

या सीरीजमधील सर्व कलाकार कोरियातील आहेत, मात्र एक भारतीय कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. पार्क हे-सू, वाई हा-जून, जंग हो-यॉन, गॉन्ग यू, हीओ सुंग-ताई आणि दिल्लीत जन्मलेला भारतीय अभिनेता अनुपम त्रिपाठी! मालिकेतील सर्व कलाकारांचा दमदार अभिनय क्षणभर त्यांच्या असहायतेवर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल. अनुपम त्रिपाठी यांनी या मालिकेत पाकिस्तानी कामगाराची भूमिका साकारली आहे. तो आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी या खेळात प्रवेश करतो.

दिग्दर्शकाला नक्की सांगायचेय काय?

‘स्क्विड गेम’ वेब सीरीज जागतिक स्तरावर हिट ठरली आहे, त्याचे दिग्दर्शन ह्वांग डोंग ह्युक यांनी केले आहे. ह्वांगने अतिशय विचारपूर्वक मालिका तयार केली आहे. मालिकेत जीवघेणा खेळ तर आहेच, पण त्यासोबतच दिग्दर्शकाने आर्थिक विषमता, फसवणूकही या कथेतून मांडली आहे. याशिवाय कर्ज माणसाला कसे असहाय्य आणि अपंग बनवते, पैशाचे मोल काय ते देखील यात दाखवले आहे. कर्जाचे ओझे मानसिक दडपण बनून तुम्हाला कसे घाबरवते हे मालिकेत पाहायला मिळते.

काही रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक ह्वांगला त्याची ही सीरीज जगासमोर आणण्यासाठी 10 वर्षे लागली. त्यावेळी तो त्याच्या आई आणि आजीबरोबर राहत होता. एक वेळ अशी आली, जेव्हा ह्वांगकडे पैसे नव्हते, म्हणून त्याला लिखाण थांबवून त्याचा लॅपटॉप देखील विकावा लागला. त्या वेळी, अभिनेत्यांना आणि गुंतवणूकदारांना या शोमध्ये पैशाच्या लढाईसाठी लोकांची अत्यंत वाईट स्थितीत राहण्याची आणि मरण्याची कल्पना आवडली नव्हती. प्रत्येकजण ही कथा अवास्तव असल्याचे कारण देत तिला नाकारत होता. पण संयमाचे फळ गोड असते असे म्हणतात. असाच काहीसा प्रकार ह्वांगसोबत पाहायला मिळाला आहे. ‘स्क्विड गेम’ हा आतापर्यंत 90 देशांमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो बनला आहे.

का आवडतेय लोकांना ही सीरीज?

मालिकेच्या प्रत्येक भागात एक खेळ आहे, जो जीवनातील अनुभवांचे रूपक आहे. ज्याप्रमाणे लोक खेळ जिंकण्यासाठी लढतात, त्याचप्रमाणे माणसाला आयुष्यातील आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. स्क्विड गेमने कोरियामध्ये सामाजिक-आर्थिक असमानता, लैंगिक असमानता आणि भांडवलशाहीची भरभराट यासारखे मुद्दे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खेळ आणि त्यातून मिळणारी शिक्षा जरी क्रूर असली तरी ती कुठेतरी जीवनाचे प्रतिनिधित्व करतेय, याचमुळे लोकांना ही कथा आवडत आहे.

हेही वाचा :

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्याच्या वाढदिवशी अभिषेक बच्चनने दिला खास मुकुट, अभिनेत्रीचे सौंदर्य जिंकेल तुमचे मन

जाता जाताही सत्कार्य करून गेला अभिनेता पुनीत राजकुमार, नेत्रदानामुळे 4 लोकांना मिळाली दृष्टी!

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.