Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुटिंगच्या सेटवर सतत बाथरुममध्ये का बेशुद्ध व्हायच्या Sridevi? अखेर सत्य समोर आलंच

शुटिंगच्या सेटवर सतत बाथरुममध्ये बेशुद्ध व्हायच्या श्रीदेवी, बाथटबमध्येच घेतला अखेरच्या श्वास... अभिनेत्रीबद्दल मोठ सत्य समोर... आजही श्रीदेवी चाहत्यांमध्ये चर्चेत

शुटिंगच्या सेटवर सतत बाथरुममध्ये का बेशुद्ध  व्हायच्या Sridevi? अखेर सत्य समोर आलंच
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 1:38 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी आपल्या घायाळ अदांनी आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. बॉलिवूडमध्ये नव्या अभिनेत्रींचं पदार्पण झालं आणि जुन्या अभिनेत्री मात्र मागे राहिल्या. पण बॉलिवूडमध्ये अभिनेत्री श्रीदेवी यांचं जे स्थान होतं, ते अद्याप कोणी घेवू शकलेलं नाही. आजही श्रीदेवी यांच्याबद्दल अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. श्रीदेवी यांच्या निधनाला आज अनेक वर्ष उलटून गेली आहेत. पण आजही चाहते आणि अनेक सेलिब्रिटी देखील श्रीदेवी यांना विसरु शकलेले नाहीत. श्रीदेवी अशा एकमेव अभिनेत्री होत्या ज्यांना सुपरस्टार अभिनेत्रीचा दर्जा मिळाला. टॉलिवूड, बॉलिवूड एवढंच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं.

श्रीदेवी यांच्याबद्दल अनेक गोष्टी आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. त्यांच्याबद्दल एक गोष्ट फार कमी चाहत्यांना माहिती आहे. तर त्यांची एक गोष्ट आज जाणून घेवू. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीदेवी सेटवर सतत बेशुद्ध व्हायच्या. यामागे अभिनेत्रीला असलेला एक आजार होता. त्या एका आजारामुळे श्रीदेवी प्रचंड त्रस्त होत्या.

लेखक सत्यार्थ नयाक यांनी त्यांच्या एका पुस्तकात श्रीदेवी यांच्या आजाराचा उल्लेख केला आहे. सत्यार्थ नयाक यांच्या पुस्तकात असलेल्या माहितीनुसार, ‘चालबाज’ सिनेमाचे दिग्दर्शक पंकज पाराशर आणि नागार्जुन यांच्या म्हणण्यानुसार, श्रीदेवी यांना ब्लड प्रेशरचा त्रास होता. ज्यामुळे त्या प्रचंड त्रस्त असायच्या. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यामुळे शुटिंग सुरु असताना त्या अनेकदा बाथरुममध्ये देखील बेशुद्ध झाल्या होत्या.. असं सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

श्रीदेवी यांचं निधन देखील बाथटबमध्ये झालं होतं. २०१८ मध्ये दुबईत लग्नात सहभागी झालेल्या श्रीदेवी यांचं हॉटेलच्या रुममधील बाथरूममध्ये असलेल्या बाथटबमध्ये निधन झालं. Queen Of Hearts यांच्याबद्दल लिहिण्यात आलं आहे. श्रीदेवीचा साधा लूक तमिळ प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता आणि हिंदी प्रेक्षकांना श्रीदेवी यांचा ग्लॅमरस अंदाज आवडला होता.

१९८३ ते १९९३ हा काळ श्रीदेवीच्या कारकिर्दीचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. याच काळात श्रीदेवी यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या. श्रीदेवी यांनी त्यांच्या कारकिर्दीत चांदनी, सदमा, हिम्मतवाला, लाडला, चालबाज आणि मिस्टर इंडिया यांसारख्या अनेक एकापेक्षा एक सिनेमे बॉलिवूडला दिले. आजही त्यांचे सिनेमे चाहते तितक्याच उत्सुकतेने पाहतात.

श्रीदेवी यांच्यानंतर त्यांची मोठी मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे. जान्हवीने आतापर्यंत अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जान्हवी हिच्यानंतर श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. खुशी लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘The Archies’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.