SSR Death Case | भाऊ शोविकच्या अटकेनंतर रियाच्या अडचणी वाढणार? एनसीबी समन्स बजावण्याची शक्यता 

एनसीबीने मोठी कारवाई करत रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली.

SSR Death Case | भाऊ शोविकच्या अटकेनंतर रियाच्या अडचणी वाढणार? एनसीबी समन्स बजावण्याची शक्यता 
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 10:59 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एनसीबी अॅक्शन मोडमध्ये आहे (NCB Likely To Issue Summons To Rhea Chakraborty). रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला एनसीबीने अटक केली आहे. सुशांत सिंह प्रकणात ड्रग्जचे धागेदोरे असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबीने मोठी कारवाई करत रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली. उद्या एनसीबी शोविक आणि मिरांडाला न्यायालयापुढे हजर करणार आहे. भावाच्या अटकेनंतर आता रियाच्या अडचणीही वाढणार आहेत. उद्या एनसीबी रियाला समन्स बजावण्याची शक्यता आहे (NCB Likely To Issue Summons To Rhea Chakraborty).

शोविक आणि सॅम्युअलने एनसीबीला काय सांगितलं?

एनसीबीच्या सूत्रांनूसार, सॅम्युअल मिरांडाने एनसीबीला दिलेल्या माहितीनुसार तो शोविकच्या सांगण्यावरुन ड्रग डीलरकडून सुशांतसाठी बड्ड नावाची ड्रग्जची व्यवस्था करत होता. तर शोविकने दिलेल्या माहितीनुसार तो सॅम्युअलला रियाच्या सांगण्यावरुन सुशांतसाठी ड्रग्ज आणायला सांगायचा आणि पैसे द्यायचा.

NCB नुसार, NDPS अंतर्गत जर ड्रग्ज घेण्याचे पुरावे मिळाले तर त्यांना तात्काळ अटक करावी लागतं. कोणाच्या अटकेमुळे कोणाच्या तपासावर परिणाम होणार नाही. जर सीबीआयला यांची चौकशी करायची असेल तर प्रोडक्शन वॉरंटवर यांनी आणलं जाईल (NCB Likely To Issue Summons To Rhea Chakraborty).

हेही वाचा : सुशांत सिंह प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला अटक

रियाच्या सांगण्यावरुन ड्रग्ज विकत घेतले, शोविकची कबुली

शोविकने कबुली दिली की त्याने बहीण रियाच्या सांगण्यावरुन सुशांतसाठी ड्रग्ज सॅम्युअलच्या माध्यमातून ड्रग्ज घेतले.

उद्या एनसीबी या दोघांना रिमांडवर घेईल. दोघांना आमोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली जाईल. सर्व चॅट दाखवेल आणि त्याबाबत माहिती घेईल. यांच्याकडून जप्त करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक गॅजेटनी एनसीबी तपासत आहेत.

एनसीबी रियाला समन्स बजावण्याची शक्यता 

उद्या रियाला चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. रियालाही अटक केल्या जाण्याची दाट शक्यता आहे. कारण, एनसीबीसमोर दिलेली साक्ष ही न्यायालयापुढे दिलेल्या साक्ष इतकीच महत्त्वाची असते (NCB Likely To Issue Summons To Rhea Chakraborty).

संबंधित बातम्या :

SSR Case | ‘शोविकच्या सांगण्यावरुन गांजा विकत घेऊन मिरांडाला द्यायचो’, एनसीबीच्या चौकशीत अबीदचा खुलासा

भल्या पहाटे धाड टाकून सॅम्युएल मिरांडाला उचललं, रियाच्या घरी पोहोचलेला NCB चा अधिकारी मराठी अभिनेत्रीचा पती

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.