Munawar Faruqui : द्वेष नाही, अखेर कलाकार जिंकला! स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी करणार शो
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी(Munawar Faruqui)चा गेल्या महिन्यात बेंगळुरू(Bengaluru)मधला शो रद्द करण्यात आला होता. आता तो पुन्हा परतणार आहे. याबाबतची माहिती त्यानं सोशल मीडिया(Social Media)वर पोस्ट शेअर (Post Shared)करून दिलीय.
मुबई : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी(Munawar Faruqui)चा गेल्या महिन्यात बेंगळुरू(Bengaluru)मधला शो रद्द करण्यात आला होता. यावरून उलटसुलट बातम्याही येत होत्या. आता त्याचा शो होणार आहे. मात्र तो बेंगळुरूत नाही होणार. याबद्दलची माहिती खुद्द मुनव्वरनं दिलीय. गेल्या काही महिन्यांत त्याचे 12हून अधिक शो रद्द झाले होते. आता तो पुन्हा परतणार आहे. याबाबतची माहिती त्यानं सोशल मीडिया(Social Media)वर पोस्ट शेअर (Post Shared)करून दिलीय.
मुनव्वरचा ‘धंदो’ मुनव्वरनं पोस्टमध्ये म्हटलंय, की आता तो कोलकाता इथं एक शो करणार आहे. तिकीट बुक करण्याची लिंकही त्यानं शेअर केलीय. त्यामुळे तो पुन्हा एकदा हसविण्यासाठी सज्ज झालाय. कोलकात्यात हा शो होणार असून 16 जानेवारीला तो नियोजित आहे. धंधो (Dhandho) असं त्याच्या शोचं नाव आहे. ज्यामध्ये तो २ तासांचा शो करणार आहे. पोस्ट शेअर करताना चो म्हणतो, मी एका नवीन शोसह कोलकाता इथं येतोय. तिकिटाची लिंक बायोमध्ये आहे. हार्ट इमोजीही त्यानं टाकलीय.
यूझर्स करतायत कमेंटवर कमेंट मुनव्वरच्या शोबद्दल जाणून घेऊन त्याचे देशभरातले चाहते खूश झाले आहेत. त्याच्या पोस्टवर अनेक यूजर्स कमेंट करत आहेत. एका यूजरनं लिहिलंय, की हा शो पुन्हा रद्द होईल का? एकजण लिहितो, शुभेच्छा… एक जण म्हणाला, तू हैदराबादला कधी येतोयस भावा?
View this post on Instagram
12 शो झालेत रद्द नोव्हेंबरमध्ये मुनव्वरचे शो रद्द झाल्यानंतर, त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, की त्याचे 2 महिन्यांत 12 शो रद्द करण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी तोडफोड करण्याची धमकी दिल्यानंतर ते रद्द करण्यात आल्याचं त्यानं सांगितलं होतं. मुनव्वरनं पोस्टमध्ये लिहिलं होतं, की द्वेष जिंकला, कलाकार हरला.
स्वरा भास्करनं केला होता निषेध मुनव्वर फारुकीचे शो रद्द झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं ट्विट करून याचा निषेध केला होता आणि म्हटलं होतं, की एक समाज म्हणून आपण गुंडगिरीला प्रोत्साहन दिलं? हे हृदयद्रावक आणि लज्जास्पद आहे. मला माफ कर मुनव्वर.
काय होता वाद? कथितपणे हिंदू देवतांचा अवमान केल्याप्रकरणी मुनव्वरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर महिनाभर तो तुरुंगात होते. त्यानंतर काहीही निष्पन्न न झाल्यानं अखेर सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता.