बॉलिवूडच्या प्रमुख अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात, आगामी चित्रपटांमधील कोट्यावधींची गुंतवणूक अडचणीत?

चंदेरी दुनियेत ड्रग्ज नावाचा डर्टी पिक्चरही चालतो हेही व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून स्पष्टपणे समोर आलंय (Star Actress of Bollywood in trouble in NCB Drugs Case ).

बॉलिवूडच्या प्रमुख अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात, आगामी चित्रपटांमधील कोट्यावधींची गुंतवणूक अडचणीत?
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 11:45 PM

मुंबई : सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज अँगलसमोर आला. त्यानंतर रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शौविकनं ड्रग्ज संदर्भातील खुलासा केला. आता ड्रग्ज कनेक्शन बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींपर्यंत कसं पोहोचलंय, हेही समोर येतंय. त्याचबरोबर चंदेरी दुनियेत ड्रग्ज नावाचा डर्टी पिक्चरही चालतो हेही व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून स्पष्टपणे समोर आलंय (Star Actress of Bollywood in trouble in NCB Drugs Case ).

दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग बॉलिवूडमधील या हिरोईन्सनाही ड्रग्जचं गालबोट लागलंय. कारण त्यांचं कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग समोर आलंय. त्यामुळे बॉलिवूडमधील चंदेरी दुनियेमागचं भयान वास्तवही समोर आलं. थिएटरच्या पडद्यावर झळकणाऱ्या या हिरोईन्स आता NCB समोर येत आहेत. या टॉप अ‍ॅक्ट्रेसचं मानधन पाहिलं तर सर्वसामान्य माणूस संपूर्ण आयुष्यात याच्या जवळपासही कमाईचा विचार करु शकता नाही.

दीपिका पादुकोण एक चित्रपटासाठी अंदाजे 7 ते 8 कोटी रुपये घेते. श्रध्दा कपूर एका चित्रपटासाठी अंदाजे 2 ते 3 कोटी रुपये घेते. रकुलप्रीत सिंगचंही मानधन अंदाजे 2 कोटींच्या घरात आहे. सारा अली खानंही एका चित्रपटासाठी अंदाजे 1 ते दीड कोटी रुपये घेते. चाहते यांना मोठं करतात. नाव आणि पैसाही मिळतो. मात्र या पैशाचा उपयोग ड्रग्जसाठी होतो का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. या कारवाईनंतर आता बॉलिवूडचंही आर्थिक गणित ढासाळणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

यातील बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हे यातलं सगळ्यात मोठं नाव आहे. आपल्या अभिनयानं अनेकांना भूरळ घालणाऱ्या दीपिकानं हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आपला डंका वाजवलायं. किंग खानसोबत ओम शांती ओम या सिनेमातून पदार्पण केल्यानंतर दीपिकानं कधीच मागे वळून बघितलं नाही. बचना ए हसिनो, लव्ह आजकल, कॉकटेल, रामलीला, पिकू, चेन्नई एक्सप्रेस, बाजीराव मस्तानी, पद्मावत, छपाक असे एकापेका एक सरस चित्रपट दीपिकाने दिलेत. दीपिकाचे आगामी काळात सपना दीदी आणि पठाण हे दोन चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.

ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूरचीही चौकशी होणार आहे. तीन पत्ती या सिनेमातून करिअरची सुरुवात करणाऱ्या श्रध्दा कपूरला खरी ओळख आशिकी 2 या सिनेमातून मिळाली. त्यानंतर एक व्हिलन, बागी, हाफ गर्लफ्रेण्ड, स्त्रीसारखे अनेक हिट चित्रपट श्रध्दानं दिलेत. आगामी काळात श्रध्दाचे स्त्री 2 आणि लव्ह रंजन दिग्दर्शित एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

साऊथमध्ये दबदबा निर्माण करणारी रकुल प्रित सिंगही ड्रग्जच्या फेऱ्यात अडकलीय. यारी या सिनेमापासून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी रकुलप्रीत सिंग साऊथमध्येच रमली. बॉलिवूडमध्येही तिनं अय्यारी, दे दे प्यार दे सारखे वेगळे चित्रपट केले. अजय देवगणसोबतचा तिचा दे दे प्यार दे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आगामी काळात अर्जुन कपूरसोबत एका रोमँटिक सिनेमातही ती दिसणार आहे. ड्रग्जच्या चौकटीत अडकलेली आणखी एक अभिनेत्री म्हणजे दिग्गज अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान. ती बॉलिवूडची नवी रायझिंग स्टारच आहे. तिने पदार्पणातच केदारनाथ आणि सिंबा सारखे सुपरडुपरहिट चित्रपट दिले.

लव्ह आजकल 2 मधल्या तिच्या अभिनयानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. विशेष म्हणजे आगामी वरुण धवनसोबतच्या कुली नंबर 1 या सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुलप्रित सिंह आपल्या अभिनयानं दबदबा निर्माण करणाऱ्या अभिनेत्री आहेत. मात्र आता त्यांचं नाव अभिनयाबरोबरच ड्रग्ज प्रकरणी देखील घेतलं जात आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव कशामुळं आलं? बॉलिवूडमधील ड्रग्ज संदर्भातलं वास्तव काय? याचा NCB च्या अधिकाऱ्यांशी सामना झाल्यावरच पर्दाफाश होणार आहे.

संबंधित बातम्या :

Deepika Padukone | समन्सनंतर दीपिकाने एनसीबी चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ कळवली

बळीराजाचा रोष दाबण्यासाठीच एनसीबीने दीपिकाला आंदोलनाच्या दिवशी चौकशीला बोलावलं : राजू शेट्टी

व्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम

संबंधित व्हिडीओ :

Star Actress of Bollywood in trouble in NCB Drugs Case

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.