आईच्या एका अटीमुळे ‘या’ सिलिब्रिटींच्या प्रेमाचा अंत; स्टार किड्सची ‘अधुरी प्रेम कहाणी’

सर्वसामान्यांप्रमाणे 'या' सेलिब्रिटींनी प्रेमाला नाही तर, आईला दिलं अधिक महत्त्व... आईच्या नकामुळे स्टार किड्सची 'अधुरी प्रेम कहाणी'

आईच्या एका अटीमुळे 'या' सिलिब्रिटींच्या प्रेमाचा अंत; स्टार किड्सची 'अधुरी प्रेम कहाणी'
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 4:03 PM

star Kids Love story : प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात येतं, पण प्रत्येकाचं प्रेम पूर्ण होतं असं नाही. अनेक कारणांमुळे दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना आपलं नातं संपवावं लागतं. अनेकदा आईच्या एका अटीमुळे देखील प्रेमाचा आणि आवडत्या व्यक्तीचा त्याग करावा लागतो. अशा प्रसंगाचा सामना फक्त सर्वसामान्यांनाच नाही तर, सेलिब्रिटींना देखील करावा लागतो. आजपर्यंत असे अनेक बॉलिवूड कपल समोर आले ज्यांचं नातं आईच्या एका अटीमुळे तुटलं. आज अशाच काही स्टार किड्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर (Abhishek Bachchan and Karisma Kapoor) एक काळ असा होता जेव्हा अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली होती. पण करिश्मा हिची आई बबीता कपूर यांना लेकीचं अभिषेक याच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे अभिषेक आणि करिश्मा यांचं नातं तुटलं. त्यानंतर अभिषेक याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केलं. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एक मुलगी आहे.

राणी मुखर्जी आणि गोविंदा ( Rani Mukherjee and Govinda) राणी मुखर्जी आणि गोविंदा यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. दोघांच्या ऑनस्क्रिन जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. एवढंच नाही तर, दोघांच्या नात्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण तेव्हा गोविंदा विवाहित असल्यामुळे राणी मुखर्जी हिच्या आईला दोघांचं नातं मान्य नव्हतं.

हे सुद्धा वाचा

करीना कपूर आणि शाहीद कपूर (Kareena Kapoor and Shahid Kapoor) एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र करीना कपूर आणि शाहीद कपूर यांच्या नात्याची चर्चा होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. पण आजही त्यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगलेली असते. तेव्हा करीनाची बहीण करिश्मा आणि आई बबिता यांनी लेकीचं शाहीद याच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता शाहीद आणि करीना दोघांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत.

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर (Katrina Kaif and Ranbir Kapoor) कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर रणबीर याने अभिनेत्री आलिया भट्ट, तर कतरिना हिने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न केलं. रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांना दोघांनाचं नातं मान्य नव्हतं. आईमुळे रणबीर याने कतरिना हिच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.