Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | सोज्वळ आईचा हटके लूक, अरुंधती-संजनाची ऑफस्क्रीन धमाल

मालिका विश्वात सध्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेची हवा पाहायला मिळते आहे. मालिकेतील वेगवेगळे ट्विस्ट आणि ट्रॅकमुळे या मालिकेने घराघरांत आपला प्रेक्षकवर्ग तयार केला आहे.

Video | सोज्वळ आईचा हटके लूक, अरुंधती-संजनाची ऑफस्क्रीन धमाल
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 4:58 PM

मुंबई : मालिका विश्वात सध्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेची हवा पाहायला मिळते आहे. मालिकेतील वेगवेगळे ट्विस्ट आणि ट्रॅकमुळे या मालिकेने घराघरांत आपला प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. ‘आई कुठे काय करते’ची आई-अरुंधती अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांनी आपल्या अभिनयाने आणि सोज्वळ स्वभावाने चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु असल्याने सगळ्या चित्रपटांची आणि मालिकांची चित्रीकरण सध्या बंद करण्यात आली आहेत. अशातच मालिकांनी दुसऱ्या राज्यात जाऊन चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या आऊटडोर शूटिंग दरम्यान अरुंधती आणि संजना अर्थात मधुराणी-रुपाली धमाल करताना दिसल्या (Star Pravah Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati And Sanjana actress Madhurani and rupali bhosle off screen fun).

सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं चित्रीकरण सिल्वासामध्ये सुरु आहे. मालिकेची संपूर्ण टीम सध्या सिल्वासामध्ये दाखल झाली आहे. इथे फावल्या वेळात सगळेच धमाल करताना दिसत आहेत. मालिकेत ‘संजना’ साकारणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) हिने ‘अरुंधती’ फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरसोबत झोके घेतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ :

नेहमी साधी साडी, वेणी अशा सोज्वळ अवतारात दिसणारी आई यावेळी मात्र ‘फन’ लूकमध्ये दिसली. मधुराणी प्रभुलकर यांनी यावेळी शॉर्ट्स आणि टी-शर्ट परिधान केले होते. लाडक्या ‘आई’चा हा हटके अवतार पाहून प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. ऑनस्क्रीन सवती असणाऱ्या या दोघी या व्हिडीओमध्ये एकत्र आनंदाने झोका घेताना दिसल्या आहेत. या व्हिडीओसोबत ‘एक झोका’ हे गाणे देखील ऐकू येत आहे. ऑन स्क्रीन जरी या दोघी एकमेकींच्या वैरी असल्या तरी ऑफ स्क्रीन मात्र एकमेकींच्या छान मैत्रिणी आहेत. त्या नेहमीच एकमेकींनसोबत धमाल करताना दिसतात (Star Pravah Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati And Sanjana actress Madhurani and rupali bhosle off screen fun).

मालिकेत नवं वळण

‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची धामधूम सुरु झाली आहे. अभिवरचे खुनाचे आरोप खोटे आहेत, हे सिद्ध झाल्यानंतर आता त्याच्या आयुष्याची नव्याने सुरुवात होणार आहे. अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. नाचगाण्यांचा धमाल कार्यक्रमही रंगणार आहे. देखमुख कुटुंबातलं हे हसतं खेळतं वातावरण आणखी किती काळ टिकणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. कारण संजनारुपी वादळ या कुटुंबावर दबा धरुन बसलेलं आहेच. त्यामुळे अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा निर्विघ्न पाह पडणार का, हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे.

(Star Pravah Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati And Sanjana actress Madhurani and rupali bhosle off screen fun)

हेही वाचा :

गोव्यात मालिकांचं शूटिंग बंद, मुख्यमंत्र्यांचा निर्णय, ‘सूर नवा..’, ‘अग्गंबाई सूनबाई’सह अनेक मालिका अडचणीत

Indian Idol 12 | आशिष कुलकर्णीचं गाणं ऐकून अनु मलिकने पकडले कान, पाहा पुढे काय झालं…

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.