Aai Kuthe Kay Karte | संजनासोबत लग्न करण्यास अनिरुद्धचा नकार! पुन्हा संसार करण्यावर काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?
देशमुख कुटुंबाच्या पाठोपाठ संजना देखील देशमुखांच्या या गावच्या घरात ठाण मांडून बसली आहे. अनिरुद्ध न सांगता गावी निघून गेल्याने आधी संतापलेल्या संजनाला आता तो आपल्यापासून दूर जाईल का? अशी भीती वाटत आहे. त्यामुळे तिने त्याच्यासोबतच राहायचे ठरवले आहे.
मुंबई : प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘आई कुठे काय करते‘ (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अभिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने देशमुख कुटुंब गावातील घरी राहायला गेले आहेत. आधीच या देशमुखांच्या घरात संजना येऊन धडकली असताना, आता अंकिताच्या रुपाने एक नवं वादळ दाखल झालं आहे. अभि-अंकिताच्या लग्नानंतर आता मालिकेत अनिरुद्धच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे (Star Pravah Aai Kuthe Kay Karte latest update aniruddh wants to cancel his divorce with arundhati).
देशमुख कुटुंबाच्या पाठोपाठ संजना देखील देशमुखांच्या या गावच्या घरात ठाण मांडून बसली आहे. अनिरुद्ध न सांगता गावी निघून गेल्याने आधी संतापलेल्या संजनाला आता तो आपल्यापासून दूर जाईल का? अशी भीती वाटत आहे. त्यामुळे तिने त्याच्यासोबतच राहायचे ठरवले आहे.
संजनासोबत लग्न करण्यास अनिरुद्धचा नकार?
आता अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटाचा दिवस हळूहळू जवळ येऊ लागला आहे. मात्र, इतके दिवस अरुंधतीसोबत राहून आता अनिरुद्धला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. त्याने आधी अरुंधतीला आपला घटस्फोटाचा निर्णय मागे घेण्याविषयी विचारणा करतो. मात्र, अरुंधती याला पूर्णपणे नकार देते. आता द्विधा मनःस्थिती अडकलेला अनिरुद्ध थेट अप्पांकडे पोहोचला आहे.
अप्पांकडे जाऊन अनिरुद्ध आपल्या मनातील सगळ्या दुविधा त्यांच्यासमोर व्यक्त करतो. अनिरुद्ध अप्पांना सांगतो की, ‘मला संजानाशी लग्न करायचं नाही. तर, अजूनही मला अरुंधतीबरोबरच संसार करायचा आहे. मी चुकलो.’ यावेळी त्याने आपल्याला या कचाट्यातून सोडवा अशी विनंती देखील त्याने अप्पांना केली आहे. यावर अप्पा त्याला म्हणतात की, ‘अनिरुद्ध तू हा विचार करायला खूप उशीर केला आहेस. मात्र आता तुझ्याकडे हा विचार करायला वेळ नाही आणि आता तू मागे फिरू शकत नाहीस. आता सगळंच बदललं आहे.’(Star Pravah Aai Kuthe Kay Karte latest update aniruddh wants to cancel his divorce with arundhati)
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
संजनाने ऐकला अनिरुद्धचा निर्णय!
अनिरुद्ध अप्पांपुढे या गोष्टी काबुल करत असताना अचानक मागून आलेल्या संजनाने त्या दोघांच्या गोष्टी ऐकल्या आहेत. अनिरुद्धला आता आपल्याशी लग्न करायचे नाही, हे ऐकून संजनाला देखील मोठा धक्का बसला आहे. तर आता या सगळ्यावर अरुंधती काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मालिकांचं शूटिंग सध्या राज्याबाहेर हलवण्यात आलं आहे. ‘आई कुठे काय करते’चं शूट सध्या सिल्व्हासा येथे होत आहे. मात्र देशमुख मंडळी मुंबई सोडून गावातल्या घरी राहायला आल्याचा बदल कथानकात करण्यात आला आहे. मात्र, आता मालिकेतील या नव्या ट्रॅकने प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.
(Star Pravah Aai Kuthe Kay Karte latest update aniruddh wants to cancel his divorce with arundhati)
हेही वाचा :
PHOTO | थोडंसं शूटिंग आणि धमाल मस्ती, ‘माझा होशील ना’च्या सेटवर ‘आमरस’ अन् ‘मिसळ’ पार्टी!