धक्कादायक! ’85 वर्षाच्या आजीबाईंपासून ते….’, अनुष्का शर्माने क्रौर्याची यादीच केली सादर

Kolkata Case: धक्कादायक! 85 वर्षांच्या महिलेपासून नवजात मुलीपर्यंत अनेकींवर बलात्कार, अनुष्का शर्माने दाखवून दिली देशातील क्रौर्याची यादी आणि विचारला अत्यंत कडू प्रश्न, सध्या सर्वत्र अनुष्का शर्माच्या पोस्टची चर्चा...

धक्कादायक! '85 वर्षाच्या आजीबाईंपासून ते....', अनुष्का शर्माने क्रौर्याची यादीच केली सादर
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 10:00 AM

कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बलात्कार आणि हत्येप्रकरणी अनेक ठिकाणी बंद देखील पुकाण्यात आला आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे… अशी मागणी होत आहे. डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आता अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने देखील तिव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे.

अनुष्का शर्मा हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक टेम्पलेट शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने देशातील क्रौर्याची यादी दाखवली आहे. भारतात 85 वर्षीय महिलेपासून ते नवजात मुलीवर देखील अत्याचार होत आहेत… सध्या अनुष्काने शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्मा हिने शेअर केलेल्या यादीमध्ये फक्त कोलकाता याठिकाणी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येबद्दलच नाही तर, अनेक धक्कादायक घटना दिसत आहेत. पीडित महिलांमध्ये 2 वर्षांच्या मुलीपासून 85 वर्षांची महिला देखील आहे. सांगायचं झालं तर, पोस्ट आतापर्यंत सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर 3.7 मिलियन वेळा शेअर करण्यात आली आहे. तर पोस्टच्या शेवटी ‘आजही तिची चुक आहे का ?’ असा प्रश्न विचारण्यात आला.

‘यावेळी तुमचं काय म्हणणं आहे, चुकी तिची आहे, कारण पुरुष कायम पुरुष राहतील?’ डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणी फक्त सामान्य जनताच नाही तर, सेलिब्रिटी देखील विरोध करत आहेत. तर अनेक सेलिब्रिटींनी देखील नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी… अशी मागणी केली आहे.

अनुष्का शर्मा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली याच्यासोबत लग्न केलं आहे. सध्या अभिनेत्री तिच्या संसारात व्यक्त असल्यामुळे अनुष्का बॉलिवूडपासून दूर आहे. सध्या अभिनेत्री स्वतःचा पूर्ण वेळ वामिका आणि अकाय यांना देत आहे.

अनुष्का गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम देशातील मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडताना दिसते. अनुष्का कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.