‘तान्हाजी’ चित्रपटात दाखवलेल्या इतिहासाशी सहमत नाही : सैफ अली खान

'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऐतिहासिक कथेशी सहमत नसल्याचं मत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केलं आहे (Saif Ali Khan on history in Tanhaji Movie).

'तान्हाजी' चित्रपटात दाखवलेल्या इतिहासाशी सहमत नाही : सैफ अली खान
Follow us
| Updated on: Jan 20, 2020 | 2:50 PM

मुंबई : ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऐतिहासिक कथेशी सहमत नसल्याचं मत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केलं आहे (Saif Ali Khan on history in Tanhaji Movie). सैफ म्हणाला, “चित्रपट चालावा यासाठी या चित्रपटात राजकीय कथा बदलून दाखवण्यात आली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे.” तो फिल्म कॅम्पेनिअनच्या पत्रकार अनुपमा चोप्रा यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होता (Saif Ali Khan on history in Tanhaji Movie).

सैफ अली खान म्हणाला, “काही कारणांमुळे मी या कथेबाबत ठोस भूमिका घेऊ शकलो नाही. कदाचित पुढच्यावेळी मी नक्कीच भूमिका घेईन. मी चित्रपटातील भूमिकेबाबत खूप उत्साही होतो. या व्यक्तिरेखेने मला प्रभावित केले होते. मात्र, चित्रपटात जी कथा दाखवली आहे तो इतिहास नाही. इतिहास काय आहे हे मला खूप चांगल्याप्रकारे माहिती आहे.”

‘चित्रपटात कोणतेही ऐतिहासिक तथ्य नाही’

भारताची संकल्पनाच इंग्रजांनंतर तयार झाली, त्याआधी ही संकल्पनाच नव्हती असं माझं मत आहे. या चित्रपटात कोणतेही ऐतिहासिक तथ्य नाही. आम्ही याबाबत कोणताही तर्क देऊ शकत नाही. कलाकार उदारमतवादी विचारांचं समर्थन करतात मात्र कामात लोकप्रियतेलाच प्राधान्य दिले जाते, हे सत्य आहे. मात्र, ही चांगली स्थिती नक्कीच नाही, असंही सैफने नमूद केलं.

‘चित्रपटातील इतिहासाशी एक भारतीय म्हणून सहमत नाही’

अभिनय आणि स्क्रिप्टमधील चुका सहन होतील मात्र, व्यावसायिक फायदा व्हावा म्हणून त्याच्या राजकीय कथेत बदल केलेले अजिबात चालणार नाही, असं मत चित्रपट निर्माते कबीर खान यांनी व्यक्त केलं होतं. याचा आधार घेत पत्रकार चोप्रा यांनी सैफला प्रश्न विचारला. त्यावर सैफ म्हणाला, “हे खरं आहे की या चित्रपटात दाखवलेल्या राजकारणाचा तथ्यांशी काहीही संबंध नाही. याच्याशी मी केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर एक भारतीय म्हणूनही सहमत नाही. मी अशा प्रकारच्या राजकारणावर याआधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. मी पुढच्यावेळी अशा कथांबाबत अधिक सतर्क राहिल.”

मला माहिती आहे हा इतिहास नाही. पण मग मी ही भूमिका का केली असाही प्रश्न विचारला जाईल. मात्र, मी या भूमिकेने खूप प्रभावित झालो होतो. असे चित्रपट चालतात असं लोकांना वाटतं, मात्र हे धोकादायक आहे. एकीकडे आम्ही उदारमतवाद आणि विवेकाबद्दल बोलतो आणि दुसरीकडे लोकप्रियतेचा मार्ग निवडतो, असंही सैफ म्हणाला.

पत्रकार अनुपमा चोप्रा यांनी घेतलेली सैफ अली खानची मुलाखत

बॉलिवूडमध्येही ध्रुवीकरण होतंय का?

बॉलिवूडमध्येही ध्रुवीकरण होतंय का? या प्रश्नावर सैफ म्हणाला, “हो बॉलिवूडमध्ये देखील ध्रुवीकरण होत आहे. देशाच्या फाळणीनंतर माझ्या कुटुंबातील जे लोक देश सोडून गेले त्यांना आपण येथे सुरक्षित राहणार नाही असं वाटत होतं. मात्र, माझ्या कुटुंबातील काही लोकांनी हा देश धर्मनिरपेक्ष असल्याचं म्हटलं. तसेच येथे कोणतीही अडचण येणार नाही म्हणत येथेच थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र, आज देशातील परिस्थिती बदलत आहे. बदलणाऱ्या परिस्थितीवरुन आता वाटतंय की आपला देश कदाचित आता धर्मनिरपेक्ष राहणार नाही.”

फक्त माझ्या कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर आम्ही सर्व आनंदी आहोत. आमच्याकडं सर्वकाही आहे. चांगले डॉक्टर आहेत, मुलांचं चांगलं शिक्षण होत आहे, चांगली गुंतवणूक होत आहे. मात्र, देशात धर्मनिरपेक्षता आणि इतर मुद्द्यांवर जे घडत आहे त्यात माझं कुटुंब सहभागी नाही. त्यासाठी आम्ही लढत नाही. विद्यार्थी लढत आहेत. मात्र, आम्ही एखाद्या मुद्द्यावर बोललो किंवा भूमिका घेतली की चित्रपटांवर बहिष्कार टाकला जातो. लोकांना नुकसान पोहचवलं जातं. त्यामुळे अनेक लोक आपल्या कुटुंबाला आणि व्यवसायाला नुकसान होऊ नये म्हणून असं करत नाही, असंही सैफने नमूद केलं.

चित्रपटावर घेण्यात येणारे नेमके आक्षेप काय?

  • चित्रपटाच्या सुरुवातीलाच हिंदूंना (राजपूत) हिंदूंविरोधात (मराठा) लढायला लावणं हा औरंगजेबाचा विश्वासघात असल्याचा दावा करण्यात आला. ऐतिहासिक तथ्यांनुसार मुघलांच्या साम्राज्यात राजपुतांची निर्णायक भूमिका आणि भागीदारी होती.
  • या चित्रपटात मराठ्यांच्या राजकीय महत्वकांक्षेला अधिक महत्व देताना मुघल आणि राजपुतांच्या राजकीय महत्वकांक्षेचं सुलभीकरण करण्यात आलं.
  • उदयभान राठो़ड औरंगजेबाशी प्रामाणिक होता म्हणून त्याला चित्रपटात नकारात्मक दाखवण्यात आलं.
  • चित्रपटात मुघलांना परदेशी दाखवण्यात आलं. मात्र, मुघल पिढ्यानपिढ्या भारतात राहत होते.

व्हिडीओ:

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.