Stree 2: बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’चाच बोलबाला; अवघ्या चार दिवसांत कमावले इतके कोटी रुपये

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. लाँग वीकेंडचा फायदा या चित्रपटाला मिळाला असून अवघ्या चार दिवसांत 'स्त्री 2'ने छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटाची आतापर्यंत किती कमाई झाली, ते जाणून घेऊयात..

Stree 2: बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2'चाच बोलबाला; अवघ्या चार दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
Stree 2 Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 10:03 AM

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री 2’ हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुरू आहे. पहिल्याच दिवशी ‘स्त्री 2’ने कमाईच्या बाबतीत ‘अॅनिमल’ आणि ‘पठाण’ या दोन मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं होतं. मोठ्या वीकेंडचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. म्हणूनच रविवारीसुद्धा श्रद्धा आणि राजकुमारच्या ‘स्त्री 2’ने दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईने बजेटचा आकडाही पार केला आहे. पहिल्याच आठवड्यात तो ब्लॉकबस्टर ठरला आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. 60 कोटी रुपये बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 200 कोटींच्या कलेक्शनजवळ पोहोचला आहे. हा चित्रपट लवकरच कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे. रविवारी या चित्रपटाने 55 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंतचा ‘स्त्री 2’च्या कमाईचा आकडा 190.55 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या चित्रपटाला रक्षाबंधनच्या सुट्टीचाही चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

‘स्त्री 2’ची आतापर्यंतची कमाई-

पहिला दिवस- 64.8 कोटी रुपये दुसरा दिवस- 35.3 कोटी रुपये तिसरा दिवस- 45.7 कोटी रुपये चौथा दिवस- 55 कोटी रुपये

अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाईने सुरुवात करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. याआधी जानेवारी महिन्यात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाने 24.6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने 95 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र ही कमाई हिंदी, तेलुगू, तमिळ अशा विविध भाषांमध्ये मिळून झाली होती.

या चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिका आहेत. ‘स्त्री 2’मध्ये अशी अनेक दृश्ये आहेत, जी तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडतील. तर काही अशीही दृश्ये आहेत, जी पाहून तुमची घाबरगुंडी उडेल. चित्रपटाच्या पहिल्या भागात ‘स्त्री’ची दहशत पहायला मिळाली होती. आता दुसऱ्या भागात ‘सरकटे’ची दहशत पहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे या सीक्वेलची कथा नवीन आणि रंजक आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.