Stree 2 Trailer : हसवता हसवता घाबरवणारा ‘स्त्री 2’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का? चित्रपटाची वाढली उत्सुकता

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना यांच्या भूमिका आहेत.

Stree 2 Trailer : हसवता हसवता घाबरवणारा 'स्त्री 2'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का? चित्रपटाची वाढली उत्सुकता
'स्त्री 2' चित्रपटाचा ट्रेलरImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 4:18 PM

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री’ या चित्रपटाने 2018 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता याच चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी ‘स्त्री 2’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर तुम्हाला हसवता हसवता घाबरवून टाकणारा आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हा ट्रेलर पहिल्या भागापेक्षाही जास्त घाबरवणारा आहे. मात्र त्याचसोबत त्यात विनोदाचाही तडका आहे. श्रद्धा कपूरने ‘स्त्री 2’चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. श्रद्धाने हा ट्रेलर शेअर करत लिहिलं, ‘हा पहा ट्रेलर… भारतात ज्या गँगची सर्वाधिक प्रतीक्षा करण्यात आली, तो अखेर परत आला आहे. ही गँग चंदेरीमधील नवीन भिती संपवण्यासाठी लढणार आहे.’ या सीक्वेलमध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिका आहेत. त्याचसोबत त्यात आणखी एका कलाकाराचा नव्याने समावेश झाला आहे. या कलाकराचं नाव आहे अभिनेत्री तमन्ना भाटिया.

हे सुद्धा वाचा

‘स्त्री 2’च्या ट्रेलरमध्ये कथेची झलक पहायला मिळते. या चित्रपटाची कथा तिथूनच सुरुवात होते जिथे पहिल्या भागात एका महिलेची आत्मा चंदेल गावातील पुरुषांशी सूड घेते. त्यानंतर तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करून तिला शांत केलं जातं. आता ‘स्त्री 2’मध्ये एक पुरुष आत्मा दाखवण्यात आला असून तो गावातील मुलींना संपवण्याचा प्रयत्न करतो. अखेर गावकरी हे विकी आणि त्याच्या गँगची मदत घेतात. या ट्रेलरमधील संवाद हसायला भाग पाडतात तर काही दृश्ये घाबरगुंडी उडवतात. एकंदरीत हा ट्रेलर प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरेल, असं दिसतंय. श्रद्धाच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देऊन चित्रपटाविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.