राखी सावंत हिचा पती आदिल खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल ; विद्यार्थ्यीनीकडून FIR दाखल
'त्याने इंटिमेट फोटो लीक करण्याची दिली धमकी...', विद्यार्थ्यीनीकडून आदिल खान याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल... राखी सावंत हिच्या पतीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ...
FIR Against Rakhi Sawant Husband Adil Khan : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत हिचा पती आदिल खान (Adil Khan) याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी राखी हिने पती आदिल याच्यावर मारहाण, फसवणूक आणि अश्लील व्हिडीओ शूट करून विकल्याचे आरोप केले होते. तर दुसरीकडे आदिल खानविरोधात एका विद्यार्थ्यीनीने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्यामुळे आदिल खान आणखी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रिपोर्ट्सनुसार, एका इराणी विद्यार्थ्यीनीने आदिलवर बलात्काराचे आरोप करत FIR दाखल केली आहे. (adil khan durrani)
राखी सावंत हिचा पती आदिल याच्या विरोधात म्हैसूर याठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका इराणी विद्यार्थ्यीनीने आदिल खान याच्या विरोधात बलात्काराचे आरोप करत म्हैसूरच्या व्हीव्ही पूरम पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यीनी डॉक्टर ऑफ फार्मसी या विषयात शिक्षण घेत होती.
तेव्हा विद्यार्थ्यीनी आणि आदिल यांची ओळख डेजर्ट लॅब फूड अड्डा याठिकाणी झाली. आदिल त्या फूड आउटलेटचा मालक होता. भेटीनंतर दोघांमधील नातं अधिक घट्ट झालं. तक्रारीनुसार, आदिल याने लग्नाचं आमिष देत म्हैसूर याठिकाणी एका अपार्टमेंट बलात्कार केल्याचा आरोप विद्यार्थ्यीनीने केला आहे. जेव्हा पाच महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यीनीने लग्नाची मागणी केली, तेव्हा आदिल याने लग्न करण्यास नकार दिला. शिवाय त्याचे अन्य मुलींसोबत देखील संबंध असल्याचे मिळालेल्या माहितीतून समोर आलं आहे.
जेव्हा पीडित विद्यार्थ्यीनीने आदिल याला पोलिसांची धमकी दिली, तेव्हा आदिल याने पीडित विद्यार्थ्यीनीला इंटिमेट फोटो लीक करण्याची धमकी दिली. शिवाय विद्यार्थ्यीनी तक्रार केली तर आदिल याने विद्यार्थ्यीनीला जीवेमारण्याची देखील धमकी दिली होती. आता या पीडित विद्यार्थ्यीनीच्या आरोपांनंतर आदिल याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे.
राखी सावंत हिने देखील आदिलवर केले गंभीर आरोप… राखी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मारहाण आणि फसवणूक आणि अश्लील व्हिडीओ बनवून विकल्याचे गंभीर आरोप देखील राखीने आदिल याच्यावर केले आहेत. त्यामुळे आदिल खान याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
एवढंच नाही तर, राखीने अनेक पुरावे देखील पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. याप्रकरणी राखी हिचे वकील म्हणाले, ‘आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. ज्यामुळे आदिल याला जामिन मिळणार आहे. १.५ कोटी रुपयांची फसवणूक प्रचंड मोठा गुन्हा आहे…’ वकिलांच्या वक्तव्यानंतर याप्रकरणी काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Rakhi Sawant lifestyle)