26 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न; वर्षभरातच पत्नीचं धर्मांतर, इस्लाम धर्म स्वीकारण्यावरून नेटकऱ्यांची टीका
'स्टाइल' या चित्रपटात भूमिका साकारलेला अभिनेता साहिल खान आठवतोय का? त्याने गेल्या वर्षी त्याच्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडशी दुसरं लग्न केलं. आता लग्नाच्या वर्षभरानंतर त्याच्या पत्नीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
अभिनेता, फिटनेस एंटरप्रन्योर आणि युट्यूबर साहिल खानने गेल्या वर्षी दुसरं लग्न केलं होतं. त्याच्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंड ॲलेक्झांड्रासोबत त्याने आयुष्याची नवी सुरुवात केली. आता लग्नाच्या एक वर्षानंतर साहिलने खुलासा केला की त्याच्या पत्नीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करत साहिलने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. ‘मला हे सांगताना अत्यंत गर्व वाटतोय की माझी पत्नी मिलेना ॲलेक्झांड्राने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे’, असं त्याने पोस्टमध्ये लिहिलंय. यावरून अनेकांनी साहिलवर टीका केली आहे. साहिलने ‘स्टाइल’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
साहिलची दुसरी पत्नी मिलेना ही युरोपच्या बेलारुसमध्ये राहणारी आहे. तिच्या धर्मांतराविषयी सांगताना साहिलने लिहिलंय, ‘मला हे सांगताना अत्यंत गर्व वाटतोय की माझ्या पत्नीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. या सुंदर प्रवासासाठी अल्हम्दुलिल्लाह! अल्लाह आम्हाला माफ करो आणि आमच्या प्रार्थनांचा स्वीकार करो.’ साहिलची ही पोस्ट वाचल्यानंतर काहींनी त्याला शुभेच्छा दिल्या. तर काहींनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ‘जर ती तुझ्यावर इतकं प्रेम करते, तर मग तिने इस्लाम धर्म स्वीकारणं का गरजेचं आहे’, असा सवाल एकाने केला. तर ‘जर तू तिच्यावर खरं प्रेम करत असशील तर तिला तिचा धर्म सोडायला भाग पाडलं नसतं’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
View this post on Instagram
‘कोणत्याच अध्ययन आणि संशोधनाशिवाय इस्लाम धर्म स्वीकार करून काय उपयोग? आणि केवळ इस्लामच नाही तर फक्त लग्नासाठी कोणत्याही धर्माला स्वीकारून काय उपयोग?’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘लग्नानंतर धर्मांतर करणं इतकं गरजेचं आहे का’, असाही सवाल काहींनी केला. साहिलच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून असंख्य कमेंट्स आले आहेत. इतकंच नव्हे तर या फोटोमध्ये साहिलच्या गळ्यात क्रॉस दिसल्यानेही नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. ‘जर तू मुस्लीम आहेस, तर दुसऱ्या धर्माचं चिन्ह का घातलंस’, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
साहिलने 2024 मध्ये खुलासा केला होता की त्याने आणि मिलेनाने रशियामध्ये साखरपुडा केला होता आणि नंतर कायदेशीर पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. साहिल 48 वर्षांचा असून मिलेना ही 22 वर्षांची आहेत. वयातील 26 वर्षांच्या अंतराबद्दल साहिलने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “ती खूप हुशार आणि तितकीच संवेदनशील आहे. आमच्या वयात बरंच अंतर असलं तरी ती तिच्या वयाच्या मानाने खूप समजूतदार आहे. तिचा स्वभाव खूप शांत आहे.” साहिल खानने अभिनेत्री निगार खानशी पहिलं लग्न केलं होतं. 2003 मध्ये दोघांनी निकाह केला होता. मात्र निकाहच्या दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला होता.