Bollywood Celebs : हाय काय अन् नाय काय… पहिलं लग्न मोडताच, दुसरा संसार सुखाने; कोण आहेत हे बॉलिवूड सेलिब्रिटी?
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेतला असला तरी, दुसऱ्या विवाहात त्यांना आनंद लाभला आहे. अरबाज खान, नीलम कोठारी आणि रेणुका शहाणे यांसारख्या कलाकारांनी दुसऱ्या लग्नातून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. हा लेख या कलाकारांच्या जीवनातील दुसऱ्या प्रेमकथा आणि त्यांच्या यशस्वी संसारावर प्रकाश टाकतो.
लग्न ही गोष्ट प्रत्येकाच्या जीवनातील आनंददायी घटना असते. लग्नानंतर आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू होतो. आपला संसार कसा आनंदात चालेल याची सर्वजण खबरदारी घेतात. पण संसार करताना काही अडचणीही येत असतात. त्यामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं. बॉलिवूड कलाकारांच्या बाबतीत या गोष्टी अधिक घडतात. बऱ्याचदा बॉलिवूड कलाकारांचा घटस्फोट झाल्याच्या किंवा त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. पण पहिलं लग्न करून दुसऱ्या विवाहानंतर सुखी जीवन जणारे असंख्य कलाकार आहेत. असे कलाकार कोण आहेत? याची चर्चा आपण करणार आहोत.
अनेक कलाकरांनी पहिलं लग्न अयशस्वी झाल्यानंतर थोडा वेळ घेतला. पुन्हा दुसरा विवाह केला आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांचा हा नवा घरोबा यशस्वीही ठरला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिने लग्नाच्या तीन वर्षानंतर 4 डिसेंबर 2024 रोजी अभिनेता नागाकडून तलाक घेतला. नागाने शोभिताशी विवाह करून आयुष्याचा नवा पट मांडला आहे. दुसरं लग्न करून सुखी संसार करणाऱ्या कलाकारांचीच माहिती आपण घेणार आहोत.
अरबाज खान
अरबाज खानने मलायका अरोडासोबत 1998मध्ये लग्न केलं होतं. दोघेही सुखात राहत होते. पण 19 वर्षानंतर अचानक दोगांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडला आणि 2017मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर गेल्यावर्षी 2023मध्ये अरबाज खानने दुसरं लग्न केलं. शूरा खानसोबत त्याचा निकाह झाला. दोघांचाही संसार सुखाने सुरू आहे.
नीलम कोठारी
अभिनेत्री नीलम कोठारीच्या आयुष्यातही असं वादळ येऊन गेलं. 2000मध्ये यूकेत राहणारा उद्योगपती ऋषि सेठिया यांच्याशी नीलमने लग्न केलं. पण काही काळानंतर त्यांचा तलाक झाला. त्यानंतर 2011मध्ये नीलमने अभिनेता समीर सोनीशी विवाह केला. सध्या दोघेही आनंदात राहत आहेत.
रेणुका शहाणे
प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्यातील बॉन्डिंग अत्यंत चांगली आहे. दोघेही एकमेकांचा रिस्पेक्ट करतात. एक आदर्श कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. रेणुका यांचं हे दुसरं लग्न आहे. मराठी रंगभूमीचे लेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी रेणुका शहाणे यांचं लग्न झालं होतं. पण नंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर रेणुका यांच्या आयुष्यात आशुतोष राणा आले. 2001 मध्ये दोघांनी विवाह केला.