“आई पाय पकडून विनवण्या करत होती, तरी माझ्यापेक्षा 30 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी..”; सुचित्रा कृष्णमूर्तीचा खुलासा

सुचित्रा वयाच्या 19 व्या वर्षी शेखर कपूर यांना भेटली आणि ती 22 वर्षांची असताना दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या पहिल्या वर्षापासूनच दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. मात्र त्यावेळी सुचित्रा गरोदर होती.

आई पाय पकडून विनवण्या करत होती, तरी माझ्यापेक्षा 30 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी..; सुचित्रा कृष्णमूर्तीचा खुलासा
Suchitra Krishnamoorthi and Shekhar KapurImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 8:35 AM

मुंबई : अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी लग्नाच्या 12 वर्षांनंतर निर्माते शेखर कपूर यांना घटस्फोट दिला. 1999 मध्ये हे दोघं विभक्त झाले. 2020 मध्ये या दोघांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्राने शेखर कपूर यांच्यावर बरेच आरोप केले आहेत. सुचित्राने ‘कभी हा कभी ना’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केलं होतं. मात्र शेखर कपूर यांच्यामुळे तिच्या करिअरला ब्रेक लागला. कारण तिने फिल्म इंडस्ट्रीत काम करू नये अशी त्यांची इच्छा होती.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा म्हणाली, “मी अभिनय करावं अशी माझी पतीची इच्छा नव्हती. पण माझ्यासाठी हा काही मोठा प्रश्न नव्हता. माझी पार्श्वभूमी फिल्म इंडस्ट्रीची नव्हती. पण शाळा आणि कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागले होते. कॉलेजमध्ये असताना मला कभी हा कभी ना या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. मी अभिनय केलेलं माझ्या आई-वडिलांना आवडायचं नाही. तरीसुद्धा मी त्यांच्याशी खोटं बोलून कोचीला शूटिंगसाठी गेले होते.”

हे सुद्धा वाचा

शेखर कपूर यांच्याशी झालेल्या भेटीविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की शेखर कपूर यांच्याशी लग्न करणं हे माझं कर्म होतं, जे मला पूर्ण करायचं होतं. कारण जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा मला ते खूप आवडू लागले होते. मी 10-12 वर्षांची असताना असा विचार करायचे की मी इम्रान खान (माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान ) किंवा शेखर कपूर यांच्याशी लग्न करेन. चॅम्पियन या चित्रपटाची कास्टिंग सुरू असताना मी त्यांना भेटले. मात्र हा चित्रपट होऊ शकला नाही. पण त्यानंतर आम्ही भेटू लागलो आणि हळूहळू मैत्री झाली. मी त्यांच्यावर प्रेम करत होते, पण ते या नात्याविषयी गंभीर नव्हते. मी त्यांना म्हटलं होतं की, जर तुम्ही माझ्याशी लग्न केलं नाही तर मी पुन्हा तुम्हाला भेटणार नाही. अशी धमकी देऊन मी त्यांच्याशी लग्न केलं.”

त्यावेळी सुचित्रा ही शेखर कपूर यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. या दोघांच्या वयातील अंतरामुळे तिच्या आईवडिलांचा लग्नाला विरोध होता. याशिवाय शेखर यांचा आधी घटस्फोट झाला होता. “माझे आईवडील या लग्नाच्या विरोधात होते, कारण त्यावेळी शेखर माझ्या आईच्या वयाचे होते. त्यात त्यांचा घटस्फोट झाला होता आणि फिल्म इंडस्ट्रीतील असल्याने मनात नकारात्मक भावना होती. माझ्या आईने अक्षरश: माझ्याकडे विनंती केली होती की त्या माणसाशी लग्न करू नको. पण मी लग्न करण्याबाबत ठाम होते. त्यामुळे नंतर जे काय घडलं ते मी स्वत: ओढवून घेतलं होतं”, असं तिने पुढे सांगितलं.

सुचित्रा वयाच्या 19 व्या वर्षी शेखर कपूर यांना भेटली आणि ती 22 वर्षांची असताना दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या पहिल्या वर्षापासूनच दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. मात्र त्यावेळी सुचित्रा गरोदर होती. “ज्यावेळी मी गरोदर होते, त्यावेळी मी विभक्त होण्याचा विचार करत होते. मला बर्कली स्कूल ऑफ म्युझिकमधून स्कॉलरशिप मिळाली होती पण नेमकं त्याचवेळी मी गरोदर होते. त्यामुळे हा सगळा नशिबाचा खेळ आहे, असं मला वाटलं होतं. बाळंतपणानंतर मी काही वर्षे तडजोड केली. पण अखेर एके दिवशी माझ्या संयमाचा बांध सुटला”, असा खुलासा तिने केला. “माझं लग्न नात्यातील अप्रामाणिकपणामुळे नाही मोडलं, तर एकमेकांचा अनादर केल्यामुळे मोडलं”, असंही ती पुढे म्हणाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.