KBC 15 : वडिलांच्या आयुष्यातील इतकी मोठी गोष्ट सुहाना खानला नाही माहित, बिग बींनी मारला टोमणा

Suhana Khan : शाहरुख खान याच्या आयुष्यातील 'ही' गोष्ट संपूर्ण जगाला माहिती, पण लेकीला नाही, सर्वांसमोर अमिताभ बच्चन यांना मारला सुहानाला टोमणा... सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांची चर्चा...

KBC 15 : वडिलांच्या आयुष्यातील इतकी मोठी गोष्ट सुहाना खानला नाही माहित, बिग बींनी मारला टोमणा
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 1:39 PM

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : बॉलिवूडच्या किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. किंग खान याच्या खासगी आयुष्याबद्दल फारशा गोष्टी चाहत्यांना माहिती नसतील, पण अभिनेत्याच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल प्रत्येक गोष्ट चाहत्यांना माहिती आहे.  अभिनेत्याबद्दल एक सर्वात महत्त्वाची गोष्ट शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिला माहिती नाही. सुहाना खान नुकताच महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कोन बनेगा करोडपती 15’ शोमध्ये उपस्थित राहिली होती. यावेळी बिग बी यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुहाना खान हिला देता आलं नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना खान हिची चर्चा रंगली आहे.

प्रश्न – उत्तरांच्या खेळात अमिताभ बच्चन यांनी सुहाना खान हिला, ‘शाहरुख खान याला आतापर्यंत ‘या’ पुरस्कारांपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही?’ असा प्रश्न विचारला. प्रश्नासाठी बिग बी यांनी सुहाना हिला चार पर्याय दिले होते. ए-पद्मश्री, बी- लीजन ऑफ ऑनर, सी- एल एटोइल ओर आणि डी – वोल्पी असे पर्याय होते.

प्रश्नाचं उत्तर देत सुहाना म्हणाली, ‘पद्मश्री…’, किंग खान याच्या लेकीचं उत्तर चुकीचं होतं. वडिलांबद्दल महत्त्वाची गोष्ट माहिती नसल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी सुहाना हिला टोमणा मारला. बिग बी म्हणाले, ‘मुली तुला माहिती नाही, तुझ्या वडिलांना काय मिळालं आहे…’

हे सुद्धा वाचा

‘तुझ्या वडिलांनी तुला फक्त एवढंच सांगून पाठवलं आहे, समोर जे बसले आहेत, त्यांनी तुझ्या वडिलांच्या वडिलांची भूमिका बजावली आहे. म्हणून त्यांना सांग थोडे सोपे प्रश्न विचारा. आता इतका सोपा प्रश्न विचारला तरी देखील तुला उत्तर देता आलं नाही…’ असं देखील बिग बी, सुहाना खान हिला म्हणाले.

सुहाना खान स्टारर ‘द अर्चिज’ सिनेमा

सुहाना खान स्टारर ‘द अर्चिज’ सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात सुहाना हिच्याशिवाय दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

‘द अर्चिज’ सिनेमाच्या माध्यमातून अनेक स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर देखील सिनेमाची चर्चा रंगली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्याच सिनेमात सुहाना आणि खुशी यांनी अगस्त्य यांच्यासोबत किसिंग सीन दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.