‘दंगल’ गर्लच नाही तर, Paa सिनेमातील अभिनेत्रीचं निधन, 14 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Taruni Sachdev | सुहानी भटनागरच नाही तर, अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्रीचं देखील वयाच्या 14 व्या वर्षी निधन, हृदयद्रावक मृत्यूचं कारण... चिमुकल्या अभिनेत्रींनी फार कमी वयात सोडलं जग

'दंगल' गर्लच नाही तर, Paa सिनेमातील अभिनेत्रीचं निधन, 14 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 8:51 AM

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : ‘दंगल’ सिनेमात अभिनेता आमिर खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या सुहानी भटनागर हिने वयाच्या 19 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुहानी एका गंभीर आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. सुहानी हिच्या निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. सुहानी हिच्या आधी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या तरुणी सचदेव हिचे वयाच्या 14 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाचं कारण कारण देखील फार भयानक होतं.

2009 मध्ये प्रदर्शित झालेला ‘पा’ सिनेमा प्रत्येकाला आठवत असेल. सिनेमात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत शाळेत शिकत असलेली अभिनेत्री तरुणी सचदेव तुम्हाला सर्वांना आठवत असलेच..

तरुणी हिने फक्त ‘पा’ सिनेमातच नाही तर, शाहरुख खान, करिश्मा कपूर यांसारख्या अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत काम केलं. सिनेमांशिवाय तरुणी हिने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केलं. रसना, कोलगेट, रिलायन्स मोबाइल, शक्ती मसाला यांसारख्या जाहिरातींमध्ये देखील काम केलं.

हे सुद्धा वाचा

कसं झालं तरुणी सचदेव हिचं निधन

14 मे 1998 रोजी तरुणी सचदेव हिचा जन्म झाला होता. तर 12 मे 2012 मध्ये तरुणी हिने अखेरचा श्वास घेतला. सांगायचं झालं तर, तरुणी तिच्या वाढदिवशी आईसोबत नेपाळ येथे जात होती. तेव्हा झालेल्या विमान अपघातात तरुणी आणि तिच्या आईचं निधन झालं.

फार कमी वयात तरुणी हिने जगाचा निरोप घेतला. तरुणी हिच्या निधनाची बतमी समोर येताच बॉलिवूडमध्ये देखील शोककळा पसरली होती. मन विचलीत करणारी गोष्ट म्हणजे तरुणी हिने नेपाळ येथे जाण्याआधी सर्व मित्रांची भेट घेतली आणि म्हणाली, ‘ही माझी तुमच्यासोबत अखेरची भेट आहे…’ तरुणी मस्करीत असं म्हणाली, पण तिचे शब्द खरे ठरले.

तरुणी हिच्यानंतर सुहानी भटनागर हिच्या निधानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. तरुणी आणि सुहानी आज जगात नाहीत, पण फार कमी वयात दोघांनी देखील अनेकांच्या नवावर राज्या केलं. स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज  दोघी नसल्या तरी अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवास कायम सर्वांच्या स्मरणात राहिल. नुकताच आमिर खान याने सुहानी हिच्या कुटुंबियांची भेट घेतली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.