फक्त हाताला सूज आली अन् दोन महिन्यातच तिने जगाचा निरोप घेतला, सुहानीबाबत नेमकं काय घडलं; वडिलांनी सांगितलं ते…

| Updated on: Feb 17, 2024 | 8:20 PM

Suhani Bhatnagar Death : अभिनेत्री सुहानी भटनागर हिच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. सुहानी भटनागर हिच्या निधनानंतर विविध चर्चा या सुरू झाल्या. आता नुकताच सुहानी भटनागर हिच्या वडिलांनी मोठा खुलासा केलाय. आमिर खान याने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुहानी भटनागरच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले.

फक्त हाताला सूज आली अन् दोन महिन्यातच तिने जगाचा निरोप घेतला, सुहानीबाबत नेमकं काय घडलं; वडिलांनी सांगितलं ते...
Follow us on

मुंबई : दबंग गर्ल सुहानी भटनागर हिच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. आमिर खान याच्या दंगल चित्रपटामध्ये सुहानी भटनागर ही आमिरच्या लेकीच्या भूमिकेत दिसली. बालकलाकार म्हणून सुहानी भटनागर हिने आपल्या करिअरची सुरूवात केली. सुहानी भटनागर हिने अवघ्या 19 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतलाय. सुहानी भटनागर हिच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुहानी भटनागरच्या निधनानंतर आमिर खान याने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. सुहानी भटनागर निधनानंतर आमिर खान याला देखील मोठा धक्का बसल्याचे दिसतंय.

आता नुकताच सुहानी भटनागर हिच्या पालकांनी मोठा खुलासा केलाय. सुहानी भटनागर हिच्यावर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचार हे सुरू होते. 16 फेब्रुवारीला सुहानी भटनागर हिने शेवटचा श्वास घेतला. नुकताच सुहानी भटनागर हिच्या वडिलांनी मोठा खुलासा केलाय. अखेर त्यांनी सांगितले की, सुहानी भटनागर हिला नेमके काय झाले होते.

सुहानी भटनागरचे वडिल म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी सुहानीच्या हाताला सूज आली. अगोदर आम्हाला ते एकदम नाॅर्मल वाटले. मात्र, हळूहळू सुहानीच्या संपूर्ण अंगावर सूज आली. त्यानंतर आम्ही डाॅक्टरांकडे तिला दाखवले. मात्र, बरेच दिवस डाॅक्टरांना नेमका काय आजार झालाय हेच समजत नव्हते. यामुळे सुहानीला दिल्लीतीस एम्समध्ये दाखल केले.

एक्समध्ये सुहानीच्या काही टेस्ट झाल्या. शेवटी समजले की, तिला डर्मेटोमायोसाइटिस नावाचा आजार झालाय. या आजाराचा उपचार स्टेरॉइड्स आहे. मात्र, स्टेरॉइड्सचा थेट परिणाम हा सुहानीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर झाला. सुहानीची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमजोर झाली. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने तिला संसर्गाची लागण झाली.

संसर्गामुळे सुहानीचे फुफ्फुस कमजोर झाली आणि त्यामध्ये पाणी भरले गेले. हेच नाही तर सुहानीला श्वास घेण्यासही त्रास होत होता. सुहानीच्या आई वडिलांनी सांगितले की, आम्हाला तिच्यावर गर्व आहे. कारण दंगल चित्रपटासाठी 25 हजार मुलांमधून तिची निवड झाली. सुहानी भटनागर हिच्या निधनानंतर तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.