Sukesh Chandrasekhar धक्कादायक! केवळ जॅकलीनच नव्हे तर बॉलीवूडमधील अन्य ‘या’ चार अभिनेत्रींना सुकेश चंद्रशेखरने दिलेत महागडी गिफ्ट

पिंकी इराणीने  सांगितले की, तिचा एक दक्षिण भारतीय चित्रपट निर्माता मित्र आहे. जो तिला भेटून तिच्यासोबत चित्रपट बनवू इच्छित होता. त्याने सांगितले की एप्रिल 2018 मध्ये पिंकी उर्फ ​​एंजलने तिला सांगितले, की आपण शेखरला दिल्लीत भेटणार आहोत.

Sukesh Chandrasekhar धक्कादायक! केवळ जॅकलीनच नव्हे तर बॉलीवूडमधील अन्य 'या' चार अभिनेत्रींना  सुकेश चंद्रशेखरने  दिलेत महागडी  गिफ्ट
Sukesh ChandrasekharImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 10:50 AM

तिहार तुरुंगात खडी फोडत असलेला ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar)बाबत आता नवनवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez)मदतीने मनीलॉड्रिंग प्रकरण उघड झाले . या प्रकरणात आता नवीनच माहिती समोर आली आहे . ठग सुकेशने केवळ जॅकलीनच नव्हते तर अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) लाही महागडी गिफ्ट दिल्याचे समोर आले आहे. याबरोबरच बिगबॉस फेम निकी तांबोळी (Nicky Tamboli) , मॉडेल चाहत खन्ना, सोफिया सिंग, अरुषा पाटील यांची भेट घेता त्यांना पैसे दिल्याचे समोर आले आहे. यासर्व मॉडेल व अभिनेत्री सुकेश चंद्रशेखराला दिल्ली तुरुंगात भेटल्याचे समोर आले आहे. या सर्वजण सुकेशची सहकारी पिंकी इराणीच्या माध्यमातून ठग सुकेशला भेटण्यासाठी तुरुंगात गेल्या होत्या .

ईडीच्या आरोपपत्रात झाले अनेक खुलासे

ईडीने आरोपी सुकेश चंद्रशेखराच्या विरोधात दाखल केलेल्या आरोप पत्रात अनेक खुलासे केले आहेत. आरोप पत्रातील माहितीनुसार पिंकीने या अभिनेत्रींची सुकेशशी वेगवेगळ्या नावांनी ओळख करून दिली होती. तसेच सुकेशकडून त्यांनामहागडे गिफ़्ट मिळऊन दिले होते यात एलव्ही बॅग, व्हर्साची घड्याळे यांसारख्या भेटवस्तू आणि पैश्याचा समावेश होता. या चार अभिनेत्रींपैकी अरुषा पाटीलने कबूल केले, की पिंकी इराणीने तिची सुकेश चंद्रशेखरशी ओळख करून दिली होती, पण तिहार तुरुंगात भेटण्यास तिने नकार दिला होता. तथापि, ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की त्याच्या बँक खात्यात ठगांकडून पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.

दक्षिण भारतीय चित्रपट निर्माता ‘शेखर’ म्हणत ओळख करून दिली

बिग बॉस’ फेम निकिता तांबोळीने दिलेल्या माहितीनुसार, पिंकी इराणीने आरोपी सुकेश चंद्रशेखरला ‘शेखर’ म्हणत त्याची ओळख करून दिली. पिंकी इराणी यांनी त्यांचा उल्लेख दक्षिण भारतीय चित्रपट निर्माता आणि मित्र असा केला. ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, निकिता तांबोळी आरोपी सुकेश चंद्रशेखरला तिहार तुरुंगात दोन वेळा भेटल्याचे समोर आले आहे. एप्रिल 2018 मध्ये पहिल्या भेटीत आरोपी पिंकी इराणी हिला सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून 10 लाख रुपये रोख मिळाले, त्यापैकी 1.5 लाख रुपये त्याने निकिता तांबोळी यांना दिले. दोन ते तीन आठवड्यांनंतर,.दुसऱ्यांदा, ती एकटीच सुकेश चंद्रशेखरला भेटायला गेली, जिथे तिला आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यामार्फत 2 लाख रुपये रोख आणि एक बॅग देण्यात आली. ईडीने 15 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या जबाब नोंदवले होते. तिने अधिकार्‍यांना असेही सांगितले की पिंकीने तिच्याशी 2018 च्या सुमारास व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला होता.

हे सुद्धा वाचा

विमानाचे तिकीटही काढले

पिंकी इराणीने  सांगितले की, तिचा एक दक्षिण भारतीय चित्रपट निर्माता मित्र आहे. जो तिला भेटून तिच्यासोबत चित्रपट बनवू इच्छित होता. त्याने सांगितले की एप्रिल 2018 मध्ये पिंकी उर्फ ​​एंजलने तिला सांगितले, की आपण शेखरला दिल्लीत भेटणार आहोत आणि तिने मुंबई ते दिल्लीच्या दोन्ही फ्लाइटचे तिकीट बुक केले आहे आणि दुसऱ्या दिवशी दिल्लीला रवाना झाली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.