सुकेश चंद्रशेखर नवरात्रीमध्ये थेट जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी करणार ‘हे’ काम, पत्रामध्ये थेट लिहिले…
जॅकलिन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. जॅकलिन फर्नांडिस ही मोठ्या वादात सापडलीये. जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव थेट 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आले.
मुंबई : सुकेश चंद्रशेखर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्या संपर्कात अनेक बाॅलिवूड अभिनेत्री असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी झाला. सुकेश चंद्रशेखर हा 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सुकेश चंद्रशेखर याने बाॅलिवूड अभिनेत्रींना अत्यंत महागडे गिफ्ट (Gift) देखील दिले. नोरा फतेही ही देखील सुकेश चंद्रशेखर याच्या संपर्कात असल्याचा खुलासा झाला.
फक्त नोरा फतेही हिच नाही तर जॅकलिन फर्नांडिस ही देखील सुकेश चंद्रशेखर यांच्या संपर्कात होती. जॅकलिन फर्नांडिस ही फक्त सुकेशच्या संपर्कात नव्हती तर तिला चक्क सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत लग्न देखील करायचे होते. जॅकलिन फर्नांडिस ही सुकेश चंद्रशेखर याला डेट करत होती. यांचे अनेक फोटोही व्हायरल झाली आहेत.
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर देखील आरोप करण्यात आले. ईडीने जॅकलिन फर्नांडिस हिची अनेकदा चाैकशी देखील केलीये. सुकेश चंद्रशेखर हा दिल्लीच्या तिहाड जेलमध्ये आहे. जेलमधून सुकेश चंद्रशेखर जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी खास पत्र लिहिताना दिसतो.
आता नुकताच जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी सुकेश चंद्रशेखर याने एक खास पत्र लिहिले आहे. हे पत्र आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतंय. सुकेश चंद्रशेखर याने आपल्या पत्राची सुरूवात केली की, माझी शेरणी माझी बेबी…उद्यापासून नवरात्री सुरू होत आहे आणि मी नऊ दिवस पूजा अर्चना करणार आहे.
माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच घडत आहे की, मी नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करणार आहे. मी हा उपवास माझ्या स्वत:साठी नाही तर तुझ्यासाठी ठेवत आहे. माता आपल्या आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला साथ देईल. मला विश्वास आहे की बेबी एक दिवस सर्व काही ठीक होईल…आता सुकेश चंद्रशेखर याने लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.