Jacqueline Fernandez | ‘वाढदिवशी सुपर सरप्राइज देणार’; तुरुंगातून जॅकलिन फर्नांडिससाठी प्रेमपत्र

तिहार तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचे जबाब नोंदवले गेले होते. या दोघींनी सुकेश आणि त्याची सहकारी पिंकी ईराणीवर गंभीर आरोप केले होते.

Jacqueline Fernandez | 'वाढदिवशी सुपर सरप्राइज देणार'; तुरुंगातून जॅकलिन फर्नांडिससाठी प्रेमपत्र
सुकेश चंद्रशेखर, जॅकलिन फर्नांडिसImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 10:01 AM

नवी दिल्ली : तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपये मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव समोर आल्यापासून या दोघांचं अफेअर चर्चेत आहे. आरोपी सुकेशसोबत तिचे प्रायव्हेट फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुकेश तुरुंगात असूनसुद्धा वेळोवेळी जॅकलिनसाठी प्रेमपत्र लिहितोय. मात्र या पत्रांवर तिने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. आता सुकेशने पुन्हा एकदा त्याच्या ‘बेबी गर्ल’ अर्थात जॅकलिनसाठी पत्र लिहिलं आहे. वकील अनंत मलिकच्या माध्यमातून त्याने हे पत्र जारी केलंय. या पत्रातून त्याने जॅकलिनला तिच्या वाढदिवसी ‘सुपर सरप्राईज’ देणार असल्याचं म्हटलंय.

सुकेशचं पत्र

जॅकलिनने नुकतंच एका अवॉर्ड शोमध्ये परफॉर्म केलं होतं. सुकेशने त्याच्या पत्रात जॅकलिनच्या या परफॉर्मन्सचं कौतुक केलं आहे. ‘माय लव्ह, माय बेबी जॅकलिन, माय बोम्मा, मी 18 एप्रिल रोजी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पाहिला. या सोहळ्यातील तुझा परफॉर्मन्स उत्कृष्ट होता. संपूर्ण शोमध्ये तुझा डान्स हा जणू शो स्टॉपर होता. स्टेजवर परफॉर्म करताना तू खूपच हॉट दिसत होतीस. तू मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात वेडं केलंस. माझ्याकडे काही शब्दच उरले नाहीत’, अशा शब्दांत त्याने जॅकलिनचं कौतुक केलं.

वाढदिवशी देणार सुपर सरप्राईज

या पत्रात सुकेशने पुढे लिहिलं, ‘माझी राणी, बुट्टा बोम्मा.. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. प्रत्येक सेकंदाला मी फक्त तुझाच विचार करतो. तुला माहितीये की मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि तू माझ्यावर किती प्रेम करतेस हेसुद्धा मला माहीत आहे. मला तुझी खूप आठवण येते. तुझ्या वाढदिवसानिमित्त मी एक सुपर सरप्राइज देणार आहे. तुला ते नक्कीच आवडेल. मी माझं वचन पूर्ण करतोय. तू सतत हसत राहावी, हीच माझी इच्छा आहे.’

हे सुद्धा वाचा

याआधीही तुरुंगातून लिहिले पत्र

याआधी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डेनिमित्त आणि होळीनिमित्तही सुकेशने जॅकलिनसाठी पत्र लिहिलं होतं. तिहार तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचे जबाब नोंदवले गेले होते. या दोघींनी सुकेश आणि त्याची सहकारी पिंकी ईराणीवर गंभीर आरोप केले होते. पिंकीच्या मदतीनेच सुकेश लोकांना फसवतो असा खुलासा जॅकलिन आणि नोराने केला होता. जॅकलिनने तिच्या जबाबात म्हटलं होतं, “सुकेश माझ्या भावनांशी खेळला आणि त्याने माझं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त केलं आहे. त्याने माझी फसवणूक केली.”

सुकेशने पिंकी ईराणीमार्फत जॅकलिनशी संपर्क साधला होता. सुकेश हा गृहमंत्रालयाशी संबंधित असून तो सरकारसाठी काम करतो, अशी खोटी ओळख तिने जॅकलिनला करून दिली होती. इतकंच नव्हे तर “तो सन टीव्हीचा मालक आहे आणि जयललिता यांच्या कुटुंबीयांशी त्याचे जवळचे संबंध आहेत. तुझा तो खूप मोठा चाहता आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील बरेच प्रोजेक्ट्स त्याने तुझ्यासाठी आणले आहेत”, असं सांगून तिची जॅकलिनची फसवणूक केली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.