‘जगात तुझ्या इतकं…, लव्ह यू माय बेबी’, तुरुंगातून सुकेशचं Jacqueline Fernandez हिला पत्र
सुकेश चंद्रशेखर गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात असून देखील अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिला पाठवतो प्रेमपत्र; आता पाठवलेल्या पत्रात तो थेट म्हणाला, 'जगात तुझ्या इतकं..'
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे तुफान चर्चेत आहे. दोघांच्या नात्याच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये कायम रंगत असतात. सुकेश चंद्रशेखर गेल्या अनेक दिवसांपासून २०० कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्ली येथे तुरुंगात बंद आहे. तुरुंगात असताना सुकेश कायम जॅकलीन फर्नांडीस हिला प्रेमपत्र पाठवत असतो. आता देखील सुकेश याने ईस्टरच्या शुभेच्छा देत जॅकलीन फर्नांडीस हिला पत्र पाठवलं आहे. सध्या सर्वत्र सुकेश याने जॅकलीन फर्नांडीस हिला पाठवलेल्या पत्राचीच चर्चा रंगत आहे.
२०० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सुकेश चंद्रशेखर दिल्ली तुरुंगात बंद आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिला देखील आरोपी करण्यात आलं आहे. पण मनी लाँड्रिंग प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत अभिनेत्रीने आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सुकेश आणि जॅकलिन यांची चर्चा कायम रंगलेली असते.
सुकेश याने आता पाठवलेल्या पत्रात देखील जॅकलिन हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. सुकेशने पत्रात लिहिलं आहे की, ‘जॅकलिन माझी बेबी, माझी बोम्मा… मी तुला ईस्टरच्या शुभेच्छा देत आहे. ईस्टर तुझ्या आवडत्या सणांपैकी एक आहे. ईस्टर एग्ससाठी तुझं प्रेम… मी कायम तुझ्या आठवणीत असतो…’
पुढे सुकेश लिहितो, ‘तुझ्यातील त्या लाहन मुलाला पाण्यासाठी मी आतूर आहे. आता मी स्वतःला थांबवू शकत नाही. तुला नाही माहिती जगात तुझ्या इतकं सुंदर कोणी नाही.. तू खूप सुंदर आहेस… लव्ह यू माय बेबी’
एवढंच नाही तर, सध्या वेळ वाईट आणि ही वेळ लवकरच निघून जाईल अशी अपेक्षा करतो… असं म्हणत सुकेश याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिला विश्वास दिला आहे. पत्रामध्ये त्याने जॅकलिनला अनेक आश्वासनेही दिली. त्याला प्रत्येक क्षणी जॅकलिनची आठवण येत असल्याचे त्यानं म्हटलं आहे.
सुकेश म्हणाला की, मला माहीत आहे की, तुलाही प्रत्येक क्षणी माझी आठवण येते. सध्या सुकेश याने जॅकलिन हिला लिहिलेल्या पत्राची तुफान चर्चा रंगत आहे. शिवाय पुढील वर्षातील ईस्टर एकत्र साजरा करू असं देखील सुकेश म्हणाला. सुकेश कायम तुरुंगातून अभिनेत्रीला पत्र लिहित असतो.
जॅकलीन फर्नांडीस हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सुकेश याच्यासोबत असलेले संबंध समोर आल्यानंतर अभिनेत्री चर्चेत आली. जॅकलीन फर्नांडीस हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.