माझ्या तीन पेंडिग्स हग्स आणि किसेस… सुकेशचं तुरुंगातून पत्र; प्रसिद्ध अभिनेत्रीला कोट्यवधीचं घर आणि द्राक्षाची बाग भेट
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिसला ख्रिसमसनिमित्त भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्याने आपले प्रेम व्यक्त केले आहे. तुरुंगातून लिहिलेल्या या पत्रात त्याने जॅकलिनला द्राक्ष बाग थेट भेट म्हणून दिल्याचंही त्याने म्हटलं आहे.
जॅकलिन फर्नांडिसला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखर यांनी लिहिले आहे, “माझ्यासाठी तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ख्रिसमस भेट आहेस. तुझे प्रेम मला मजबूत ठेवते.”
सुकेशचं जॅकलिनसाठी भावनिक पत्र
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला मोठा ठग सुकेश चंद्रशेखर याने ख्रिसमसच्या मुहूर्तावर जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिले आहे. हे पत्र सुकेशने तुरुंगातून लिहिले आहे. या पत्राद्वारे त्याने जॅकलिनवरचे प्रेम व्यक्त केले आहे.
सुकेशने या पत्रात लिहिले आहे की, “एकमेकांपासून दूर राहिल्यानंतरही मला तुझा सांताक्लॉज बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माझ्या प्रिये, तुझ्यासाठी ख्रिसमस खूप खास आहे.”
‘बेबी गर्ल’ म्हणत सुकेशच्या जॅकलिनला ख्रिसमसच्या शुभेच्छा
सुकेशने पुढे लिहिले, “बेबी गर्ल, मेरी ख्रिसमस. माझे प्रेम, आणखी एक सुंदर वर्ष आणि आपला आवडता सण आपण एकमेकांशिवाय करत आहोत. आपले आत्मे एकमेकांशी जोडलेले आहेत. तुला मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना, मी तुझा हात पकडून तुझ्या डोळ्यात पाहून तुला शुभेच्छा देत आहे. असं मी फिल करू शकतोय की” असं म्हणत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्याने पुढे लिहिले की, “आज मी तुला वाईनच्या बाटलीने आश्चर्यचकित करणार नाही, तर मी तुला फ्रान्समध्ये एक संपूर्ण द्राक्ष बाग भेट देत आहे, प्रेमाचा देश ज्याचे तु कधी स्वप्न पाहिले होते.”
107 वर्षे जुनी द्राक्ष बाग भेट
सुकेशने पुढे जॅकलिनसाठी लिहिले, “बेबी, तुझा सांता आज तुझी इच्छा प्रत्यक्षात आणत आहे. तुझी ख्रिसमस भेट जी मी तुला आज देत आहे ती 107 वर्षांची एक सुंदर टस्कन शैली असलेली द्राक्ष बाग आहे, माझ्या प्रिय, तुझ्यासाठी ख्रिसमसची सर्वोत्तम भेट आहे. तुला ती नक्की आवडेल.”
त्याने पुढे लिहिले, “बेबी गर्ल, तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ख्रिसमस भेट आहेस. तुझी माझ्या मनातील प्रेमाची जागा कधीच कोणी बदलू शकत नाही. बाळा, या सुंदर प्रसंगी तुझ्याशिवाय, फक्त तू आणि मी आहेस. हे तुझे प्रेम आहे जे मला टिकवून ठेवते. व्हाइनयार्डचे नाव बदलून ‘द वाईन ऑफ लव्ह’ जॅकलीन फर्नांडिस असं केलं आहे.
‘मी तुझ्या प्रेमात वेडा झालोय…’
तुरुंगात असलेल्या सुकेशने जॅकलीनवर प्रेम व्यक्त करत पुढे म्हटलं आहे, “बाळा, मला आशा आहे की तुला ख्रिसमस गिफ्ट आवडेल. मी तुझा हात धरून द्राक्षमळ्यात फिरण्यासाठी मी खूप आतुर आहे. जगाला वाटेल की मी वेडा आहे. मी वेडा आहे यात शंका नाही. मी बाहेर येईपर्यंत माझी वाट पाहा आणि हे जग आपल्याला पुन्हा एकत्र पाहिलं.
तो पुढे म्हणाला, “बाळ, मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्या मिठी आणि किसेसची प्रतीक्षा आता करू शकत नाही. मला तुझी खूप आठवण येत आहे.” अशा पद्धतीने सुकेशने त्याच्या सर्व भावना आणि त्याचे जॅकलीनवरचे प्रेम एका पत्राद्वारे व्यक्त केलं आहे. त्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.