हत्येचे 8 महिने प्लानिंग, 25 लाखांची सुपारी; सलमानला मारण्यासाठी कोणते दोन प्लॅन होते? शूटर सुक्खाचे पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे.

अटक करण्यात आलेल्या शूटर सुक्खाने पोलिसांच्या चौकशीत मोठे खुलासे केले आहेत. त्यातील एक म्हणजे त्यांने सलमान खानला मारण्यासाठी दोन प्लान काय करण्यात आले होते याची माहिती दिली. तसेच सलमानच्या हत्येसाठी जवळपास 8 महिने प्लानिंग सुरु असल्याचेही शूटरने सांगितले.

हत्येचे 8 महिने प्लानिंग, 25 लाखांची सुपारी; सलमानला मारण्यासाठी कोणते दोन प्लॅन होते? शूटर सुक्खाचे पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे.
Salman Khan
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 6:32 PM

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई यांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली तसेच बिश्नोई टोळीशी संबंधित गोळीबार करणाऱ्यांचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. याच शोध मोहिमेदरम्यान मुंबई पोलिसांनी नुकतेच लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर सुक्खा उर्फ सुखबीर बलबीर सिंग याला हरियाणातील पानिपत येथून अटक केली. सुक्खा याने सलमान खानला मारण्यासाठी दोन वेळा प्लॅन केले होते. मात्र दोन्ही वेळेस ते प्लॅन फसल्याची कबुली सुख्खाने दिली.

काय होता हत्येचा पहिला प्लॅन ?

लॉरेन्स बिश्नोई टोळीने एप्रिलमध्ये 2024 अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार केला होता. या अज्ञातांना गोळ्या झाडण्यासाठी बिश्नोई टोळीचा शूटर सुक्खानेच पिस्टल पुरवल्या असल्याचे उघड झाले. त्यावेळी सलमान खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय व्यक्त केला होता. तसेच हा हल्ला सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना मारण्याच्या उद्देशाने करण्यात आला असल्याचेही सलमानने मुंबई पोलिसांना म्हटले होते. दरम्यान यानंतर दोन शूटर्सना अटकही करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहित्याच्या आधारे सलमान खानला मारण्याचा पहिला प्लॅन फसल्यानंतर त्याच्या हत्येचा दुसऱ्यांदा कट रचण्यात आल्याचं सांगितलं. मात्र त्या प्लॅनबद्दल पोलिसांना आधीच माहिती मिळाल्यामुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

काय होता हत्येचा दुसरा प्लॅन?

सलमान खान त्याच्या नवी मुंबईतील फार्महाऊसवर जात असताना त्याच्यावर हल्ला करण्य़ाचा आणखी एक कट बिश्नोई टोळीकडून रचण्यात आला होता. सलमानच्या हत्येच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये बिश्नोई टोळीचा शूटर सुक्खा हा महत्त्वाचा प्यादा होता. सलमान खानला संपवण्यासाठी हे आरोपी ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 पर्यंच प्लानिंग करण्यात आली, असंही चौकशीत उघड आले आहे.

तब्बल 60 ते 70 लोक हे सलमानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. त्यांच्याकडून पनवेल येथील फार्म हाऊस आणि गोरेगावच्या फिल्म सिटी येथील शूटिंगच्या ठिकाणची घराची रेकी केली जात होती. या सर्वांना सुक्खाने कामावर ठेवलं होतं. एवढचं नाही तर, सलमानला मारण्यासाठी १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हायर करण्यात आलं असल्याची माहितीही समोल आली आहे.

प्लॅननुसार शूटर सुक्खाने केली सलमानच्या गार्डसोबत मैत्री 

प्लॅननुसार शूटर सुक्खाने सलमान खानच्या गार्डसोबत त्याच्या घराची रेकी करण्यासाठी मैत्री केली होती. संधी मिळताच सलमान खानवर हल्ला करायचा असे ठरवण्यात आले होते. मात्र त्याआधीच सलमानवर वांद्रे येथील त्याच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याआधारे पोलिसांनी त्याची सुरक्षा अजून वाढवली.त्यामुळे हा दुसरा प्लॅनही फसल्याचं सुक्खाने सांगितले.

पोलिसांनी अटक केली तेव्हा सुक्खा नशेत होता

सुक्खाला नुकतेच हरियाणातील पानिपत येथून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी तेथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली होती. सर्व सापळा रचून पोलिसांनी शूटर सुक्खाला अटक केली. मुंबई पोलिसांनी सुक्खाला अटक केली तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला त्याचे नावही नीट उच्चारता येत नव्हते. याशिवाय ओळख लपवण्यासाठी त्याने दाढीही वाढवली होती. मात्र पोलिस रेकॉर्डमध्ये असलेल्या फोटोच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली.

बिश्नोई टोळीचे जाळे अनेक राज्यात

चौकशीदरम्यान सुक्खाने सांगितले की, बिश्नोई टोळीचे जाळे अनेक राज्यात पसरले आहे. त्याने असेही सांगितले की, एप्रिलमध्ये त्यानेच टोळीतील इतर शूटर्सच्या मदतीने सलमान खानवर गोळीबार केला होता.एवढचं नाही तर सुख्खानेच त्या अज्ञातांना गोळ्या झाडण्यासाठी पिस्तुल पुरवल्या होत्या. तसेच सलमान खानला मारण्याची सुक्खा आताही उघड उघड धमकी देत असल्याचं म्हटलं जात आहे. पण सुक्खाला अटक केल्यामुळे अनेक मोठे खुलासे झाले. त्यामुळे सलमान खानच्या जीवाला असलेला धोका तसेच त्याचे गांभिर्य लक्षात घेता त्याची सुरक्षा अजून वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.