Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16: “शालिन, टीनाला त्यांची लायकी दाखव”; सुंबुलचे वडील असं का म्हणाले?

वडिलांच्या सल्ल्यानंतर शालिन, टीनाला सुंबुल शिकवणार धडा? बिग बॉसमध्ये रंजक ट्विस्ट

Bigg Boss 16: शालिन, टीनाला त्यांची लायकी दाखव; सुंबुलचे वडील असं का म्हणाले?
सुंबुलच्या वडिलांचा मुलीला सल्लाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 8:58 AM

मुंबई: बिग बॉस 16 चा खेळ दिवसेंदिवस रंजक होताना दिसतोय. या शोच्या प्रत्येक सिझनमध्ये स्पर्धकांमध्ये फुलत असलेली नवी प्रेमकहाणी पहायला मिळते. तर कधी प्रेमाचा त्रिकोणही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतो. यंदाच्या सिझनमध्ये ‘ईमली’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुंबुल तौकीर, टीव्ही अभिनेता शालिन भनोत आणि ‘उतरन’ फेम टीना दत्ता या तिघांमध्ये प्रेमाचा त्रिकोण पहायला मिळतोय. या ‘लव्ह ट्रँगल’मध्ये आता सुंबुलच्या वडिलांची एण्ट्री झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये सुंबुलला पुन्हा एकदा तिच्या वडिलांशी फोनवर बोलण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी लेकीला बिग बॉसच्या घरात टिकण्यासाठी काही सल्ले दिले.

कन्फेशन रुममध्ये सुंबुल तिच्या वडिलांशी बोलत असते. मुलीच्या खेळीवर तेसुद्धा फारसे खूश नाहीत. “बेटा, हे मी काय पाहतोय?” असं ते म्हणताच सुंबुलला रडू कोसळतं. “पापा, मलाच कळत नाहीये काय होतंय. मी खरं सांगतेय”, असं ती त्यांना म्हणते.

हे सुद्धा वाचा

“तुला माहितीये का, बाहेर लोक तुझ्याबद्दल बरंवाईट बोलतायत. लोक म्हणतायत की 18 वर्षांची मुलगी ही 40 वर्षांच्या अभिनेत्याच्या मागे लागली आहे”, असं तिचे वडील पुढे सांगतात. वडिलांना समजावत सुंबुल म्हणते, “पापा, तुम्ही मला नीट ओळखता. मी अशी अजिबात नाही. ते लोक समोर वेगळं वागतात आणि मागे वेगळं बोलतात. तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

मुलीचं वक्तव्य ऐकल्यानंतर सुंबुलचे वडील तिला शोमध्ये खेळण्याबाबत सल्ला देतात. “ती लोकं चांगली नाहीत. ते शिव्या देतात. आता तू शालिन आणि टीनाला त्यांची लायकी दाखव. शालिन भनोतपासून तू चार हात लांबच राहा. मी तुझ्यावर नाराज नाही. नॅशनल टीव्हीवर तू टीनाला तिची जागा दाखव”, असं ते तिला सांगतात.

तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेन, असा विश्वास ती वडिलांना दाखवते. शालिन आणि टीना तुझ्या मैत्रीचा गैरफायदा उचलत असल्याचं ते सुंबुलला समजावून सांगतात. बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यातही सुंबुलच्या वडिलांनी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळीही त्यांनी तिला शालिन आणि टीनापासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र सुंबुलने त्या दोघांशी मैत्री करण्याचा पर्याय निवडला.

भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका.
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.