नागराज मंजुळे यांना न्यायालयाकडून समन्स, नक्की काय आहे प्रकरण?

Nagraj Manjule: एका पाठोपाठ एक हीट सिनेमे देणारे नागराज मंजुळे यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून समन्स जारी... नक्की काय आहे प्रकरण? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नागराज मंजुळे यांची चर्चा...

नागराज मंजुळे यांना न्यायालयाकडून समन्स, नक्की काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 9:31 AM

Nagraj Manjule: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिलेत. चाहत्यांमध्ये देखील नागराज मंजुळे यांची फार मोठी क्रेझ आहे. एका पाठोपाठ एक हीट सिनेमे देणारे नागराज मंजुळे आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या सिनेमाची कथा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांनी केलं आहे.

दरम्यान, सिनेमाच्या कथेवरून वाद सुरु असताना संजय दुधाणे यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे. सिनेमाच्या निर्मिती व प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई आणि ठरावासाठी दुधाणे यांच्याकडून अ‍ॅड. रविंद्र शिंदे व अ‍ॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

याबाबत जातीने हजर रहाण्याचे समन्स न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि ज्योती देशपांडे यांना पाठवलं आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नागराज मंजुळे यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, फॅन्ड्री, सैराट, झुंड या सारखे सिनेमे नागराज यांनी मराठी सिनेविश्वाला दिले आहेत. एवढंच नाही तर, ‘नाळ’ आणि ‘नाळ 2’ या सिनेमांनी देखील चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं.

नागराज मंजुळे मराठी सिनेविश्वातील एक मोठं नाव आहे. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या करियरची सुरुवात शुन्यापासून केली आणि आज ते यशाच्या उच्च शिखरावर पोहोचले आहे. पण आता नागराज मंजुळे अडचणीत अडकले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.