Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Athiya – KL Rahul यांना लग्नात खरंच मिळालेत कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट ; सुनील शेट्टी यांच्याकडून सत्य समोर

अथिया - केएल राहुल यांना लग्नात भेट म्हणून मिळालं आहे ५० कोटी रुपयांच घर आणि महागडी गाडी? सुनील शेट्टी यांच्याकडून सत्य अखेर समोर

Athiya - KL Rahul यांना लग्नात खरंच मिळालेत कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट ; सुनील शेट्टी यांच्याकडून सत्य समोर
अथिया - केएल राहुल यांच्यासाठी सुनील शेट्टी यांनी खास फोटो पोस्ट करत भावना केल्या व्यक्त Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 11:47 AM

Athiya-KL Rahul Wedding : नव्या वर्षातील जानेवारी महिला झगमगत्या विश्वासाठी प्रचंड खास आहे. कारण अभिनेता शाहरुख खान स्टारर (Shah Rukh Khan) स्टारर ‘पठाण’ (Pathaan) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) – केएल राहुल (KL Rahul) यांच्या लग्नामुळे सर्वत्र बॉलिवूडची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या थाटात अथिया आणि केएल राहुल यांचं लग्न झालं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटो व्हायरल होत असताना अथिया आणि केएल राहुल यांना लग्नात महागडे गिफ्ट मिळाले असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. अथिया आणि केएल राहुल यांना खरंच महागड्या भेटवस्तू मिळाल्या की नाही? याचं उत्तर खुद्द अभिनेते सुनील शेट्टी यांनी दिलं आहे.

अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नानंतर सुनिल शेट्टी यांनी लेक आणि जावयाला ५० कोटी रुपयांचं भव्य घर भेट म्हणून दिल्याच्या चर्चांनी जोर धरला. शिवाय इतर सेलिब्रिटींनी अथिया आणि केएल राहुल यांना महागड्या गाड्या, घड्याळ आणि बाईक्स दिल्याच्या चर्चा रंगू लागल्या. पण रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा खुलासा खु्द्द सुनील शेट्टी यांनी केला.

हे सुद्धा वाचा

अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नानंतर रंगणाऱ्या चर्चांवर सुनील शेट्टी म्हणाले, ‘लग्नानंतर भेटवस्तूंबद्दल रंगणाऱ्या चर्चा व्यर्थ आहेत.’ असं म्हणत सुनील शेट्टी यांनी एक विनंती देखील केली. कोणती गोष्ट सांगण्याआधी कुटुंबाला एकदा विचारा आणि खात्री करुन घ्या. सुनील शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर अथिया आणि केएल राहुल महागड्या भेटवस्तू मिळाल्या नासल्याचं समोर आलं आहे.

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी २३ जानेवारीच्या मुहूर्तावर लग्न केलं. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अथिया आणि राहुल यांनी गेल्या वर्षी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली.

अथिया आणि राहुल खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्न सोहळ्यात क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अथियाच्या लग्नानंतर अभिनेते सुनील शेट्टी यांनी पापाराझींना मिठाई देवून आनंद साजरा केला.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.