अथिया – केएल राहुल यांच्यासाठी सुनील शेट्टी यांनी खास फोटो पोस्ट करत भावना केल्या व्यक्त
अथियाच्या लग्नानंतर अभिनेते सुनील शेट्टी यांनी पापाराझींना मिठाई देवून आनंद साजरा केला. सुनील शेट्टी सध्या प्रचंड आनंदी आहेत. लेकीचं लग्न झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहे.
मुंबई : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी २३ जानेवारीच्या मुहूर्तावर लग्न केलं. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अथिया आणि राहुल यांनी गेल्या वर्षी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली. अथिया आणि राहुल खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्न सोहळ्यात क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अथियाच्या लग्नानंतर अभिनेते सुनील शेट्टी यांनी पापाराझींना मिठाई देवून आनंद साजरा केला. सुनील शेट्टी सध्या प्रचंड आनंदी आहेत. लेकीचं लग्न झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहे.
सुनील शेट्टी यांनी अथिया आणि केएल राहुल यांचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये भावना व्यक्त केल्या. अभिनेता म्हणाले, ‘कायम धरुन ठेवण्यासाठी एक हात आणि विश्वासाचं कारण म्हणजे त्या व्यक्तीचं आयुष्यात असलेलं स्थान आणि सामग्री म्हणजे प्रेम आणि विश्वास… अभिनंदन…’ सध्या सुनील शेट्टी यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सध्या अथिया आणि राहुल यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लग्नात अथियाने पेस्टल गुलाबी रंगाचा एम्बेलिश्ड लेहंगा घातला होता. अथिया हिचा लेहंगा प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्ना हिने डिझाइन केला आहे. अथियाचा लेहंगा तयार करण्यासाठी दहा वीस नाही तर, तब्बल १० हजार तास लागले.
अथिया आणि राहुल यांच्या लग्नात इशांत शर्मा आणि वरुण आरोन यांसारख्या क्रिकेटर्ससोबतच डायना पेंटी, आकांक्षा रंजन कपूर, अंशुला कपूर, अनुपम खेर आणि कृष्णा श्रॉफ यांसोबतच अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अथिया आणि राहुल यांच्या लग्नात काही ठरावीक पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. तर अनेकांनी दोघांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.