कपिल शर्मासोबतच्या वादावर 7 वर्षांनंतर सुनील ग्रोवरने सोडलं मौन; म्हणाला “विमानात बसल्यावर समजलं..”

'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करताना कॉमेडियन सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात एका विमानप्रवासादरम्यान वाद झाला होता. या वादानंतर सुनीलने कपिलचा शो सोडून दिला होता. आता सात वर्षांनंतर हे दोघं एकत्र आले आहेत. सुनीलने या वादावर अखेर मौन सोडलं आहे.

कपिल शर्मासोबतच्या वादावर 7 वर्षांनंतर सुनील ग्रोवरने सोडलं मौन; म्हणाला विमानात बसल्यावर समजलं..
Sunil Grover and Kapil SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 8:46 AM

टेलिव्हिजनवर प्रचंड लोकप्रिय झालेला ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कॉमेडियन कपिल शर्मा जरी या शोचा मुख्य कर्ताधर्ता असला तरी त्यातील इतर कलाकारांच्या दमदार कामामुळे प्रेक्षकांमध्ये हा शो लोकप्रिय ठरला. मात्र जेव्हा अचानक सुनील ग्रोवरने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांची निराशा झाली होती. विमानातून प्रवास करताना कपिलसोबत सुनीलचा वाद झाला आणि त्यानंतर त्याने हा शो सोडल्याचं म्हटलं गेलं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर सुनील आणि कपिल पुन्हा एकत्र येत आहेत. त्याआधी या वादावर आता सात वर्षांनंतर सुनील ग्रोवरने प्रतिक्रिया दिली आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या नव्या शोनिमित्त नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत सुनीलने कपिलसोबतच्या वादावर मौन सोडलं.

कपिलसोबतच्या वादावर सुनीलची प्रतिक्रिया

सुनीलला जेव्हा पत्रकारांनी कपिलसोबतच्या वादाविषयी प्रश्न विचारला, तेव्हा अनेकांना त्याच्याकडून काहीतरी गंभीर उत्तराची अपेक्षा होती. मात्र कॉमेडियन सुनीलने याठिकाणी त्याच्या विनोदबुद्धीचा पुरेपूर वापर केला. वादावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “विमानात बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं की येत्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा दबदबा खूप वाढणार आहे. त्यावेळी नेटफ्लिक्स भारतात नवीनच होतं. आम्हाला वाटलं की टेलिव्हिजनच्या प्रेक्षकाला जोडून ठेवण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागेल. म्हणूनच आम्ही पब्लिसिटी स्टंट म्हणून ते भांडण केलं होतं.” हे बोलताना सुनीलसह इतरांनाही हसू अनावर झालं होतं.

हे सुद्धा वाचा

पहा शोचा ट्रेलर

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

नेटफ्लिक्सच्या शोसाठी पुन्हा एकत्र

सुनीलसोबतच्या वादानंतर कपिलने त्याची माफीसुद्धा मागितली होती. मात्र सुनील त्याच्या शोमध्ये परतण्यास तयार नव्हता. अखेर सात वर्षांनंतर या दोघांमधील वाद मिटले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. शनिवारी नेटफ्लिक्सने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या शोचा ट्रेलर प्रदर्शित केला. या ट्रेलरमध्ये सुनील आणि कपिल यांच्यासोबत कृष्णा अभिषेकसुद्धा दिसून आला. हा शो नेटफ्लिक्सवर येत्या 30 मार्चपासून सुरू होणार आहे. त्याचे नवीन एपिसोड्स दर शनिवारी रात्री 8 वाजता अपलोड केले जातील.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.