बॉलिवूडची ‘लेडी अंबानी’ आहे सुनील शेट्टी यांची पत्नी; कमाईचा आकडा पतीपेक्षा अधिक
कमाईमध्ये सुनील शेट्टी आणि पत्नी माना शेट्टी एकमेकांना देतात कांटे की टक्कर, कोंट्यवधींचा व्यवसाय एकट्या करतात माना शेट्टी, जाणून घ्या माना शेट्टी यांच्याबद्दल काही खास गोष्टी
मुंबई : अभिनेते सुनील शेट्टी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र सुनील यांचे सिनेमे आणि त्यांच्या स्टाईलच्या चर्चा असायच्या. आता सुनील शेट्टी बॉलिवूडपासून दूर असले तरी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. सुनील यांच्या खासगी आणि प्रोशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सुनील यांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्यापेक्षा पत्नीची कमाई अधिक आहे. कमाईमध्ये सुनील शेट्टी आणि पत्नी माना शेट्टी एकमेकांना कांटे की टक्कर देतात. माना शेट्टी एकट्या कोट्यवधींचा व्यवसाय करतात.
माना शेट्टी फक्त सुनील शेट्टी यांच्या पत्नी नसून यशस्वी उद्योजक देखील आहेत. यशस्वी उद्योजक असल्यामुळे माना शेट्टी यांना बॉलिवूडची ‘लेडी अंबानी’ म्हणून देखील ओळखतात. माना शेट्टी कोट्यवधींचा व्यवसाय एकट्या सांभाळतात. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात फॅशन डिझायनर म्हणून केली.
फॅशन डिझायनिंगमध्ये पाऊल टाकल्यानंतर माना शेट्टी यांनी ‘Mana & Isha’ नावाच्या ब्रँडची स्थापना केली. माना यांनी या व्यवसायाची सुरुवात बहिण ईशा हिच्यासोबत केली होती. व्यवसाया शिवायमाना शेट्टी त्यांच्या आईच्या एनजीओसोबत देखील काम करतात. त्यांच्या कामाचं कैतुक सर्वच स्तरातून होत असतं.
माना यांनी पती सुनील शेट्टी यांच्यासोबत S2 नावाने एक रिअल इस्टेट प्रोजेक्ट सुरु केलं होतं. या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी २१ लग्जरी व्हिला बांधले. त्यांनी बांधलेले व्हिला अनेक सेलिब्रिटी आणि उद्योजकांनी खरेदी केले. एवढंच नाही तर, माना शेट्टी यांचं ‘R-हाऊस’ नावाचं लाईफस्टाईल स्टोर देखील आहे.
माना शेट्टी यांच्या ‘R-हाऊस’ स्टोरमध्ये डेकोरेशनचं सामान, गिफ्ट, लाईटिंग आणि घरात लागणाऱ्या वस्तू मिळतात. शिवाय त्यांच्या या स्टोरमध्ये अनेक महागडे फर्निचर देखील उपलब्ध आहेत. रिपोर्टनुसार, माना यांच्या स्टोरमधील फर्निचर ८० टक्के भारतातून तर बाकी परदेशातून मागवण्यात येतात.
सध्या माना शेट्टी आणि सुनील शेट्टी मुलगी अथिया शेट्टीच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. सोमवारी अथिया शेट्टी हिने क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केलं आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अथिया आणि राहुल यांनी गेल्या वर्षी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली. अथिया आणि राहुल खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये विवाहबंधनात अडकले.