Sunita Ahuja : रवीना टंडन आणि गोविंदाच्या नात्याबद्दल पत्नी सुनीता म्हणाली, ‘माझ्या आधी ती….’
Sunita Ahuja : बॉलिवूड स्टार गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात ती गोविंदा आणि सहकलाकारांच्या फ्लर्टबद्दल बोलली. सुनीताने यावेळी रविना टंडनच नाव घेतलं.
बॉलिवूडचा स्टार गोविंदा आजही अनेकांना भावतो. त्याने आपला अभिनय आणि डान्सच्या माध्यमातून बरीच फॅन फॉलोईंग कमावली आहे. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाला आज सगळेजण ओळखतात. सुनीता तिच्या बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच तिच्या इंटरव्यूचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात ती गोविंदा आणि सहकलाकारांमधील फर्ल्टबद्दल बोललीय. तिने रवीना टंडनचा एक किस्सा सांगितला. रविनाला गोविंदा आधी भेटला असता, तर तिने त्याच्याशी लग्न केलं असतं, असं सुनीता म्हणाली.
गोविंदासोबत कुठल्या को-स्टार फ्लर्ट केलं किंवा लग्नापर्यंत विषय झालाय का? यावर सुनीताने रविना टंडनच नाव घेतलं. रवीना गोविंदाची खूप चांगली मैत्रीण आहे. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलय. रवीना आजही बोलते चीची म्हणजे गोविंदा तू मला पहिला भेटला असतास, तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं. त्यावर सुनीता आपली Reaction देताना म्हणाली की, ‘मी म्हटलं घेऊन जा, समजेल तुला’
गोविंदाने अर्धीच गोष्ट सांगितली
सुनीताने हिंदी रशसोबत बोलताना वर्ष 2024 मध्ये गोविंदाला गोळी लागली, त्याचा सुद्धा उल्लेख केला आहे. मागच्यावर्षी गोविंदाच्या पायाला गोळी लागलेली. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला. गोविंदाने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये या घटनेचा उल्लेखही केला. शिल्पा शेट्टी जेव्हा रुग्णालयात भेटायला आली, तेव्हा मस्करीमध्ये ती म्हणालेली की, ही गोळी सुनीताने मारलीय. त्याविषयी सुनीता बोलली की, शो मध्ये गोविंदाने अर्धीच गोष्ट सांगितली. कारण शिल्पा मस्करीमध्ये हे बोलली, तेव्हा ती तिथेच होती.
‘मी गोळी मारली असती, तर…’
शिल्पा शेट्टीसोबतचा रुग्णालयातील हा किस्सा सुनीताने सांगितला. सुनीता त्यावेळी मस्करीत म्हणाली की, “शिल्पा मी गोळी चालवली असती, तर छातीवर मारली असती. पायावर नसती मारली. काम करायचं तर पूर्ण नाहीतर करायचं नाही” गोविंदाने 90 च्या दशकात शिल्पा शेट्टी आणि रविना टंडनसोबत अनेक चित्रपटात काम केलय. यात दूल्हे राजा’, ‘बड़े मियां छोटे मियां’, ‘आंटी नंबर’, ‘आग’, ‘हथकडी’, ‘छोटे सरकार’ आणि ‘परदेसी बाबू’ असे अनेक चित्रपट आहेत.