Sunny Deol: सनी देओलवर निर्मात्यांकडून फसवणुकीचा आरोप, 20 वर्षांनंतरही परत मिळाले नाहीत पैसे

सुनील ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहेत, तो चित्रपट 'जानवर' असल्याचं म्हटलं जात आहे. जो नंतर अक्षय कुमारने केला आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

Sunny Deol: सनी देओलवर निर्मात्यांकडून फसवणुकीचा आरोप, 20 वर्षांनंतरही परत मिळाले नाहीत पैसे
Sunny DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 3:22 PM

अभिनेता सनी देओल (Sunny Deol) ॲक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. त्याने चित्रपटात जबरदस्त ॲक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘गदर 2’च्या (Gadar 2) शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र यादरम्यान निर्माता सुनील दर्शन (Sunil Darshan) यांनी सनी देओलवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी एका चित्रपटासाठी सनी देओलने त्यांच्याकडून मार्केट रेटपेक्षा जास्त पैसे घेतले आणि चित्रपट करण्यास नकार दिल्याचा आरोप सुनील दर्शन यांनी केला आहे. तसंच सनीने त्यांचे पैसेही परत केले नाहीत, असं म्हटलंय.

एका मुलाखतीदरम्यान सुनील दर्शन यांनी सांगितलं की, “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनी देओल लंडनला गेला होता आणि परत आलाच नाही. याच कारणामुळे मला माझा चित्रपट अपेक्षेनुसार संपवता आला नाही. अखेर मला तो चित्रपट तसाच रिलीज करावा लागला. सनीने मला वचन देण्यास भाग पाडलं होतं की मी त्याला त्याच्या करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत करीन. त्यासाठी मी माझं एक वर्ष योगदान दिलं. माझ्या पुढच्या चित्रपटात तो काम करेल या आशेने मी चित्रपटाची ऑफर त्याला दिली. त्याने माझा चित्रपट साइन केला पण जबाबदारी पार पाडली नाही.”

सनी देओलने चित्रपटाच्या विषयावर काम करण्याची गरज असल्याचं सांगत शूटिंग करण्यास नकार दिल्याचं दर्शन यांनी सांगितलं. सुनील ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहेत, तो चित्रपट ‘जानवर’ असल्याचं म्हटलं जात आहे. जो नंतर अक्षय कुमारने केला आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

हे सुद्धा वाचा

सनी देओल लवकरच ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ या चित्रपटात दिसणार आहे. आर बाल्की यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दलकर सलमान आणि पूजा भट्टदेखील झळकणार आहेत. याशिवाय सनी देओल ‘गदर 2’ या चित्रपटासाठीही काम करत आहे. यामध्ये तो पुन्हा एकदा अमिषा पटेलसोबत दिसणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.