Gadar 2 | सनी देओलच्या ‘गदर 2’ची बंपर ॲडव्हान्स बुकिंग; पहिल्याच दिवशी होणार जबरदस्त कमाई

येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट सीक्वेल आहेत.

Gadar 2 | सनी देओलच्या 'गदर 2'ची बंपर ॲडव्हान्स बुकिंग; पहिल्याच दिवशी होणार जबरदस्त कमाई
Gadar 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 11:37 AM

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या आगामी ‘गदर 2’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. तब्बल 22 वर्षांनंतर हा सीक्वेल प्रदर्शित होत आहे. ‘गदर 2’ या चित्रपटातून पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकीनाची जोडी एकत्र झळकणार आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास दहा दिवस आधीच निर्मात्यांनी चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू केली आहे. या ॲडव्हान्स बुकिंगमुळे पहिल्याच दिवशी ‘गदर 2’ची धमाकेदार कमाई होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

‘गदर 2’चे दिग्दर्शक अनिल शर्मा चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगबद्दल फारच उत्सुक आहेत. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय, ‘आता बुक माय शो पाहिला. राज मंदिर जयपूरमध्ये संपूर्ण आठवडा पिवळ्या रंगात दिसतोय. देवाची ‘गदर 2’वर कृपा आहे. दमदार बुकिंग सुरू आहे. मात्र अद्याप आयनॉक्स आणि पीव्हीआरमध्ये बुकिंगची सुरुवात झाली नाही. लवकरच तिथेही ॲडव्हान्स बुकिंगला सुरू होईल. धन्यवाद प्रेक्षक!’

हे सुद्धा वाचा

रिपोर्ट्सनुसार, ‘गदर 2’ या चित्रपटाची मूव्ही मॅक्स चेनमध्ये 1985, सिनेपोलीसमध्ये 3900 आणि मिराजमध्ये 2500 तिकिटं विकली गेली आहेत. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाची 9800 तिकिटं विकली गेली होती. तर रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची 12000 तिकिटं विकली गेली होती.

सनी देओलच्या या चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता पाहता पहिल्याच दिवशी चित्रपटाची बंपर कमाई होऊ शकते, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा 30 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज आहे.

येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट सीक्वेल आहेत. 2001 मध्ये सनी देओलचा ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. तर 2012 मध्ये अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून पसंती मिळाली होती.

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला तुफान यश मिळालं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही अनिल शर्मा यांनीच केलंय. विशेष म्हणजे जवळपास 20 वर्षांनंतर प्रदर्शित होणाऱ्या या सीक्वेलमधील बरेच कलाकार हे पहिल्या भागातील आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.