Marathi News Entertainment Sunny deol ameesha patel gadar 2 director anil sharma shared experience on set cast and crew became emotional
Gadar 2 च्या सेटवर सकीना-ताराला पाहून पाणावले सर्वांचे डोळे; दिग्दर्शकांनी सांगितला 20 वर्षांनंतरचा अनुभव
अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता वीस वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.
1 / 5
अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता वीस वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाशी निगडीत काही आठवणी आणि किस्से सांगितले आहेत.
2 / 5
"या सीक्वेलच्या शूटिंगसाठी वर्षभराचा काळ लागला. मला पाच-सहा महिन्यांत शूटिंग संपवायची होती. पण तेव्हा ओमायक्रॉनची लाट, कोरोना आणि पावसामुळे आम्हाला शूटिंग पुढे ढकलावं लागलं. आम्ही जेव्हा सेटवर पोहोचलो, तेव्हा जणू आम्ही वीस वर्षांपूर्वीच्या कालावधीत पोहोचलो, असंच जाणवलं. तो क्षण खूपच भावनिक होता. शूटिंगदरम्यान बहुतांश तीच लोकं होती, ज्यांनी गदरमध्ये काम केलं होतं", असं त्यांनी सांगितलं.
3 / 5
त्या भावनिक क्षणाविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, "शकीना आणि ताराला आम्ही वीस वर्षांनंतर त्याच गेटअपमध्ये पाहिलं तेव्हा सर्वजण भावूक झाले होते. तो संपूर्ण माहौल पाहून मला असं वाटलं जणू मी इंटरवलच्या आधी गदरचं शूटिंग केलं होतं आणि इंटरवलनंतर सीक्वेलचं शूटिंग करतोय. सेटवर असलेल्या प्रत्येकाचे डोणे पाणावले होते."
4 / 5
वीस वर्षांनंतर सीक्वेल बनवताना आणि त्याच कलाकारांना पुन्हा ऑफर देतानाचा अनुभव कसा होता असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "सनी देओलला खूप आधीपासून हा सीक्वेल करायचा होता. फक्त त्याची एकच अट होती की चित्रपटाचा प्रभाव हा पहिल्या गदरसारखाच असलाच पाहिजे. मी जेव्हा सीक्वेलची कथा त्याला ऐकवली, तेव्हा त्याचे डोळे पाणावले होते. अमिषासुद्धा रडू लागली होती."
5 / 5
गदरचा सीक्वेल बनवण्यासाठी इतकी वर्षे का वाट पाहिली, या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं, "मला असा सीक्वेल बनवायचा नव्हता, की फक्त टायटलच्या जोरावर त्यात कोणतीही कथा भरली जावी. गॉडफादर, अवतार, बाहुबली, केजीएफ यांसारख्या चित्रपटांचे सीक्वेल त्याच कलाकारांना घेऊन बनवण्यात आले आहेत. मलासुद्धा पहिल्या भागातील कलाकारांसोबतच चित्रपट बनवायचा होता. चित्रपटाची कथा 20 वर्षांच्या लीपनंतर सुरू होईल. गदरमध्ये जो लहान मुलगा जीते (उत्कर्ष शर्मा) होता, तो आता मोठा झाला आहे."