‘गदर 2’मुळे एकत्र आले बहीण भाऊ, पहिल्यांदाच रक्षाबंधन साजरे करताना दिसणार सनी देओल आणि ईशा
सनी देओल हा सध्या तूफान चर्चेत असलेला अभिनेता आहे. सनी देओल याचा नुकताच रिलीज झालेला गदर 2 हा चित्रपट धमाका करत आहे. चित्रपटाने कमाईमध्ये एक मोठा टप्पा पार केला आहे. बऱ्याच वर्षांनंतर हिट चित्रपट देण्यात सनी देओल याचा नक्कीच यश मिळाले आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सनी देओल हा सध्या तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे यावेळी सनी देओल (Sunny Deol) हा खूपच आनंदी दिसत आहे. बऱ्याच वर्षांनंतर सनी देओल याचा चित्रपट हिट ठरलाय. विशेष म्हणजे अवघ्या आठ दिवसांमध्ये धमाकेदार कमाई करत गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झालाय. पुढील काही दिवस चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. गदर 2 ने अनेक रेकाॅर्ड तोडण्यास सुरूवात केलीये. गदर 2 चित्रपटाची सुरूवातीपासूनच चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत होती. गदर 2 चित्रपटाने मोठा धमाका केलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सनी देओल हा गदर 2 चे प्रमोशन करताना दिसला आहे.
विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील सनी देओल आणि अमीषा पटेल हे दिसले. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटामुळे आता सनी देओल याच्या सावत्र बहीण ईशा देओल आणि अहाना या देखील जवळ आल्या आहेत. गदर 2 चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी सनी देओल याच्यासोबत बहीण ईशा देओल आणि अहानासोबत दिसल्या.
विशेष म्हणजे हे पहिल्यांदाच सावत्र बहीण भाऊ एका फोटोमध्ये दिसले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच मोठा आनंद झाला. असे सांगितले जात आहे की, गदर 2 हा चित्रपट धमाका करत असल्याने सनी देओल हा इतका जास्त आनंदी झाला आहे की, मागेच्या सर्व गोष्टी विसरून आजचा विचार करताना सनी दिसत आहे.
इतकेच नाही तर आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आपल्या सावत्र बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे करताना सनी देओल हा दिसणार आहे. या रक्षाबंधनाला सनी देओल आपल्या बहिणींच्या घरी जाणार आहे. यामुळे आता धर्मेंद्र देखील खुश आहेत. काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता.
या व्हिडीओमध्ये सनी देओल, बाॅबी देओल, ईशा देओल आणि अहाना दे चार बहीण भाऊ एकत्र दिसत होते. याच दिवसाची धर्मेंद्र अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसले होते. इतकेच नाही तर या बहीण भावांना कोणाचीही नजर लागू नये, असे अनेकांनी म्हटले होते. सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट पठाण चित्रपटाचे रेकाॅर्ड तोडणार असल्याची जोरदार रंगताना दिसत आहे.