Dharmendra | ‘माझे वडील काहीही…’, धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओल यांनी सोडलं मौन

वयाच्या ८७ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी चित्रीत केला किसिंग सीन... हेमा मालिनी यांच्यानंतर सनी देओल यांची प्रतिक्रिया... सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनची चर्चा...

Dharmendra | 'माझे वडील काहीही...', धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओल यांनी सोडलं मौन
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 9:18 AM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : ‘शोले’, ‘अपने’, ‘सीता और गीता’, ‘धरम वीर’, ‘लोहा’, ‘आंखे’, ‘यमला पगला दिवाना’, ‘अली बाबा चालीस चोर’, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेते धर्मेंद्र यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. वयाच्या ८७ व्या वर्षी देखील धर्मेंद्र मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. नुकताच धर्मेंद्र दिग्दर्शक करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले आहे.

‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ बॉक्स ऑफिसवर कमाई देखील करताना दिसत आहे. पण सिनेमा अभिनेता राणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लव्हस्टोरीमुळे नाही तर, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनमुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगत आहे.

धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर अभिनेत्री आणि पत्नी हेमा मालिनी यांच्यानंतर अभिनेते सनी देओल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी वडिलांच्या किसिंग सीनवर सनी देओल म्हणाले, ‘माझे वडील काहीही करु शकतात. मी तर म्हणेल, माझे एकमेव अभिनेते आहेतच, जे या वयात असं करू शकतात…’

हे सुद्धा वाचा

पुढे सनी देओल म्हणाले, ‘मी अद्याप वडिलांचा सिनेमा पाहिलेला नाही. मी जास्त सिनेमे पाहत नाही. माझे अनेक सिनेमे देखील मी पाहिले नाहीत. एवढंच नाही तर किसिंग सीनवर मी माझ्या वडिलांसोबत बोलू देखील शकत नाही.’ सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओल यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा रंगत आहे.

धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मी त्यांचा किसिंग सीन पाहिलेला नाही. पण चाहत्यांना त्यांची भूमिका आवडली आहे. हे मला ठाऊक आहे.. धर्मेंद्र यांच्यासाठी मी आनंदी आहे. कारण त्यांना कॅमेऱ्यासमोर रहायला आवडतं. घरी देखील ते कायम स्वतःचे व्हिडीओ पाहत असतात.. ‘ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.

सनी देओल सध्या ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. ११ ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होणार असल्यामुळे सनी देओल सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. तब्बल २२ वर्षांनंतर ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कमाई केली. आता ‘गदर २’ सिनेमची चर्चा जोर धरत आहे. २२ वर्षांनंतर सकिना – तारा सिंग यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.