Sunny Deol | दारु पिण्याबद्दल सनी देओलचं मत वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का!

फिल्म इंडस्ट्रीतील देओल कुटुंबीयांविषयी चाहत्यांमध्ये एक वेगळंच कुतूहल आहे. या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने दारुबद्दल त्याचं मतं मांडलं. आपल्याला दारु अजिबात आवडत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

Sunny Deol | दारु पिण्याबद्दल सनी देओलचं मत वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का!
Sunny Deol
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 6:07 PM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सनी देओल त्याच्या ‘गदर 2’ या चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद अनुभवत आहे. त्याच्या या चित्रपटाला केवळ भारतातच नाही तर जगभरात दमदार प्रतिसाद मिळाला. 65 वर्षीय सनी देओलने तारा सिंगच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर आपली विशेष छाप सोडली. बॉलिवूडच्या काही फिट अभिनेत्यांमध्ये सनी देओलचं नाव समाविष्ट होतं आणि हे सर्वांनाच माहित आहे की त्याला दारू किंवा अन्य कुठलंही व्यसन नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने दारूविषयी त्याचं स्पष्ट मत मांडलं.

सनीने सांगितलं की तो जेव्हा इंग्लंडमध्ये होता तेव्हा तो दारू प्यायला होता. मात्र लोकांना दारू इतकी का आवडते हे मला आजही समजत नसल्याचं त्याने म्हटलं. सनी देओलचा मुलगा राजवीर याने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत सनी दारूविषयी व्यक्त झाला.

दारुबद्दल काय म्हणाला सनी देओल?

‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या या मुलाखतीत सनी म्हणाला, “असं नाहीये की मी दारू प्यायलोच नाही. जेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो तेव्हा समाजाचा एक भाग होण्यासाठी मी दारू प्यायला होतो. एक तर ती इतकी कडू, त्यात तिचा इतका दुर्गंध, प्यायलानंतर डोकं सुद्धा दुखायला लागतं, तरी ते लोकांना इतकं का आवडतं हे मला समजत नाही. म्हणूनच मला दारू कधीच आवडली नाही.”

हे सुद्धा वाचा

मुलाने सांगितला किस्सा

या मुलाखतीत सनी देओलचा मुलगा राजवीर यानेसुद्धा एक किस्सा सांगितला. जेव्हा तो बिअर प्यायल्यानंतर घरी आला तेव्हा वडील सनी देओलची प्रतिक्रिया कशी होती याविषयी त्याने सांगितलं. राजवीर म्हणाला, “जेव्हा मी एक बिअर पिऊन घरी गेलो होतो. तेव्हा डॅडला समजलं होतं. ते झोपले होते आणि चार्जर घेण्यासाठी मी त्यांच्या बेडजवळ गेलो होतो. मी माझा चार्जर तिथून घेतला, मात्र तितक्यात दुसरी वस्तू खाली पडली. यामुळे त्यांना वाटलं की मी दारू प्यायलो आहे. माझ्याजवळ त्यांना बिअरचा वास आला आणि त्यानंतर..” हा किस्सा सांगतानाच राजवीर हसू लागतो.

यावेळी सनी देओलला हा किस्सा आठवला का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सनी देओल पुढे म्हणाला, “माझ्या दोन्ही मुलांनी दारू कधी प्यायला सुरुवात केली हे मलाच कळलं नाही. आमच्या कुटुंबात आधीपासूनच असं आहे. माझ्या वडिलांनाही माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत नाही. या गोष्टीमुळे आपली मुलं शिस्तप्रिय राहतात. एक मुलगा तेच करेल जे त्याला करायचं असतं. मी स्वतः एका स्ट्रिक्ट कुटुंबातून आलो आहे. मात्र मला जे करायचं होतं ते मी केलं. पण दारू प्यायला मला कधीच आवडलं नाही.”

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.