विदेशात सनी देओल आणि धर्मेंद्र यांची धमाल, थेट अमेरिकेत बाप लेकाच्या जोडीने केले थेट
बाॅलिवूड अभिनेता सनी देओल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या गदर 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. सनी देओल याच्या या चित्रपटाने तगडी कमाई केलीये. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेज ही बघायला मिळाली. सध्या सनी देओल हा विदेशात धमाल करतोय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा गदर 2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. विशेष म्हणजे सनी देओल याच्या या चित्रपटाने मोठा धमाका केला. गदर 2 चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळाला. गदर 2 चित्रपटाने 500 कोटींपेक्षा अधिक कमाई ही बाॅक्स आॅफिसवर केलीये. गदर 2 (Gadar 2) चित्रपटाचे बजेट 60 कोटी होते. म्हणजेच काय तर गदर 2 हा चित्रपट सुपरहिट नक्कीच ठरला. गदर 2 चित्रपटाने रिलीजच्या 37 व्या दिवशीही तब्बल 70 लाखांचे कलेक्शन केले. गदर हा चित्रपट (Movie) तब्बल 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला. मुळात म्हणजे गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळाली. गदर 2 चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच ठरलाय. गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये सनी देओल याने आयोजन केले. या पार्टीला बाॅलिवूडच्या स्टारने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
विशेष म्हणजे मागील वाद विसरून शाहरूख खान देखील सनी देओल याच्या या पार्टीमध्ये पत्नी गाैरी खान हिच्यासोबत सहभागी झाला. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. काही दिवसांपूर्वीच सनी देओल हा विदेशात गेलाय. वडील धर्मेंद्र यांच्यावर पुढील काही दिवस विदेशात उपचार चालणार असल्याने सनी देओल सध्या विदेशात आहे.
View this post on Instagram
सनी देओल याने नुकताच एक अत्यंत खास फोटो हा सोशल मीडियावर शेअर केलाय. सनी देओल याने शेअर केलेला हा फोटो सर्वांनाच खूप जास्त आवडलाय. सनी देओल हा विदेशात वडिलांसोबत खास वेळ घालवताना दिसतोय. या फोटोमध्ये विदेशात सनी देओल आणि धर्मेंद्र हे मस्त पिझ्झा पार्टी करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघेही खुश दिसत आहेत.
सनी देओल याने शेअर केलेल्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट देताना दिसत आहेत. सर्वांनाच हा फोटो जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय. सनी देओल हा गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर आपल्या वडिलांसोबत अधिक चांगला वेळ घालताना दिसतोय. गदर 2 चित्रपटानंतर सनी देओल याच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर आल्याचे देखील सांगितले जातंय. एका मागून एक चित्रपटांमध्ये धमाका करताना सनी देओल हा दिसणार आहे.