सनी देओल याचे वाढले भाव, रामायण चित्रपटासाठी घेतली तब्बल इतके कोटी फिस
बाॅलिवूड अभिनेता सनी देओल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सनी देओल याचा रिलीज झालेला गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे ब्रेक केले आहेत. चित्रपटाने तगडी कमाई केली.
मुंबई : सध्या रामायण हा चित्रपट तूफान चर्चेत आहे. रामायण चित्रपटामध्ये रणवीर कपूर हा मुख्य भूमिकेत असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. आता रणबीर कपूर याच्या या चित्रपटामध्ये सनी देओल हा धमाल करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सनी देओल लॉर्ड हनुमान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी सनी देओल याने तगडी फिस घेतलीये. हनुमान यांचे पात्र साकारण्यासाठी सनी देओल याने तब्बल 45 कोटी फिस घेतल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
सनी देओल हा गदर 2 चित्रपटानंतर तूफान चर्चेत आहे. गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला. गदर 2 ने बाॅक्स आॅफिसवर जबरदस्त अशी कामगिरी केली. गदर 2 चे बजेट 60 कोटी होते. चित्रपटाने बाॅक्स बाॅक्स आॅफिसवर 700 कोटींच्या आसपास कमाई केली.
सनी देओल याच्यासोबत या चित्रपटात अमीषा पटेल ही मुख्य भूमिकेत दिसली. गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल याने आपल्या फिसमध्ये मोठी वाढ केलीये. विशेष म्हणजे गदर 2 नंतर सनी देओल याच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर आहेत. आता रामायण चित्रपटात सनी धमाला करेल.
काही दिवसांपूर्वीच सनी देओल याने हे स्पष्ट केले की, गदर 2 चित्रपटामध्ये तो गेल्या काही दिवसांपासून सतत बिझी होता. यामुळे आता पुढील काही दिवस तो आपल्या कुटुंबियांना वेळ देणार. छोटया ब्रेकनंतर परत तो शूटिंगला सुरूवात करेल. सनी देओल हा वडील धर्मेंद्र यांच्यासोबत विदेशात खास वेळ घालवताना देखील दिसला.
सनी देओल आणि धर्मेंद्र हे विदेशात पिझ्झा खाताना दिसले. यावेळीचा खास फोटो धर्मेंद्र यांनी शेअर करत आपल्या लेकाचे काैतुक केले. सनी देओल याने गदर 2 चित्रपटाची सक्सेस पार्टी मुंबईमध्ये ठेवली. या पार्टीला अनेक बाॅलिवूड कलाकार उपस्थित राहिले. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.