Deol Family | सरकारी तिजोरीतून होते देओल कुटुंबियांची कमाई, जाणून घ्या आकडा
Deol Family | धर्मेंद्र, हेमा मालिनी, सनी देओल यांची होते सरकारी तिजोरीतून कमाई, जाणून घ्या आकडा... सध्या सर्वत्र देओल कुटुंबातील सदस्यांच्या कमाईची चर्चा..
मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : देओल कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील देओल कुटुंब एका खास कारणासाठी चर्चेत आलं आहे. देओल कुटुंबातील अनेकांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. एवढंच नाही तर, काही सदस्यांनी आपला मोर्चा राजकारणाच्या दिशेने वळवळा. अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते सनी देओल यांनी राजकारणात प्रवेश केला आणि स्वतःची नवी ओळख निर्माण केली. देओल कुटुंब फक्त सिनेमांच्या माध्यमातून कमाई करत नाही तर, सरकारी तिजोरीतून देखील त्यांना मानधन मिळतं.
‘गदर २’ फेम अभिनेते सनी देओल यांनी २०१९ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीत, सनी यांनी पंजाबमधील गुरदासापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जनतेनेही त्यांना निराश केलं नाही. खासदार असल्यामुळे सरकारी तिजोरीतून त्यांना मानधन मिळतं.
खासदार असल्यामुळे सनी देओल यांना दर महिन्याला १ लाख रुपये मानधन मिळतं. एवढंच नाही तर, सनी देओल यांच्या कर्यालयाच्या खर्चासाठी दर महिन्याला २० हजार आणि कर्मचाऱ्यांसाठी ४० हजार रुपये मानधन मिळतं. शिवाय प्रवास आणि मेडिकल अलाउंस यांसारखे खर्च देखील सरकारी तिजोरीतून होतो.
धर्मेंद्र यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, धर्मेंद्र माजी खासदार होते. ज्यामुळे त्यांना महिन्याला पेन्शन मिळते. त्यांची महिन्याची पेन्शन २५ हजार रुपये आहे. धर्मेंद्र यांनी बिकानेर येथील भाजपच्या सीटवरून निवडणूक लढवली होती. २००४ ते २००९ पर्यंत त्यांनी खासदार म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यामुळे त्यांना आता पेन्शन मिळतं.
धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना देखील सरकारी तिजोरीतून मानधन मिळतं. हेमा मालिनी मधुरा येथील भाजप पक्षच्या खासदार आहेत. हेमा मालिनी यांनी देखील सनी देओल यांच्याप्रमाणे मानधन मिळतं.. हेमा मालिनी यांची देखील सरकारी तिजोरीतून कमाई होते..
सनी देओल नाही लढवणार २०२४ ची लोकसभा निवडणूक
सनी देओल म्हणाले, ‘एक अभिनेता म्हणून काम करणं हीच माझी आता निवडणूक असणार आहे. एक अभिनेता म्हणून देशाची सेवा करू अशी माझी इच्छआ आहे.. तुम्ही कायम एक काम करु शकता. एकत्र अनेक कामं करू शकत नाही. मी ज्या विचाराने राजकारणात प्रवेश केलं होतं, ते काम मी एक अभिनेता म्हणून देखील करु शकतो..’
पुढे सनी देओल म्हणाले, ‘मी एक अभिनेता म्हणून सर्वकाही करु शकतो. पण राजनीतीमध्ये एखादा शब्द दिला आणि काम पूर्ण करु शकलो नाही तर, मला अस्वस्थ होतं. मी असं करु शकत नाही. मी यापुढे एक अभिनेता म्हणून देशाची सेवा करेल..’ असं स्पष्टीकरण देत सनी देओल यांनी त्यांचा निर्णय चाहत्यांना सांगितला आहे.