Sunny Deol | चित्रपटाच्या फिस वाढीच्या चर्चांवर एका शब्दात दिले सनी देओल याने उत्तर, थेट म्हणाला, 50 कोटी हा आता
बाॅलिवूड अभिनेता सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. सनी देओल याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. सनी देओल याने अनेक वर्षांनंतर हा हिट चित्रपट दिला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील करण्यात आले.
मुंबई : सनी देओल याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर हा चित्रपट तब्बल 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे चित्रपटाने मोठा जलवा केला. गदर 2 या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत होती. गदर 2 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट (Movie) ठरलाय. गदर 2 चित्रपटामध्ये सनी देओल आणि अमीषा पटेल हे मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे सनी देओल आणि अमीषा यांनी या चित्रपटाचे धमाकेदार पद्धतीने प्रमोशन देखील केले. चाहत्यांना हा चित्रपट आवडलाय.
विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाने मोठा रेकाॅर्ड तयार करत पहिल्याच दिवशी तब्बल 40 कोटींची कमाई केली. गदर 2 चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले. गदर 2 चित्रपट आता 500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झालाय. विशेष म्हणजे हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. गदर 2 चित्रपटाला चाहत्यांनी मोठे प्रेम हे नक्कीच दिले.
गदर 2 हा चित्रपट यंदाच्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरलाय. गदर 2 चित्रटामुळे सनी देओल हा चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन सनी देओल याने मुंबईमध्ये केले. या पार्टीला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीतील अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसले.
गदर 2 चित्रपट रिलीज झाल्यानंतर एक चर्चा तूफान रंगताना दिसत आहे. गदर 2 नंतर सनी देओल याने आपल्या फिसमध्ये मोठी वाढ करून एका चित्रपटासाठी सनी देओल हा तब्बल 50 कोटी रूपये फिस घेणार असल्याचे सांगितले जात आहे. आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सनी देओल हा यावर भाष्य करताना दिसला आहे.
सनी देओल हा म्हणाला की, मुळात म्हणजे तो किती पैसे कमवणार यावर किती पैसे द्यायचे हे निर्माता ठरवतो. सनी देओल पुढे म्हणाला, मला जे काम करायला आवडते तेच काम मी करतो विनाकारण ओझे होईल असे नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, सनी देओल याने गदर 2 नंतर आपल्या फिसमध्ये मोठी वाढ केलीये.
आता सनी देओल याचा मुलगा राजवीर देओल हा देखील चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसणार आहे. राजवीर देओल याचा चित्रपट काही दिवसांमध्ये रिलीज होईल. राजवीर देओल याने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करत सांगितले की, माझ्या आई वडिलांची अजिबातच इच्छा नव्हती की, मी अभिनेता व्हावे. मात्र, माझे प्रेम अभिनयावरच झाले.