Sunny Deol Meet Fans : बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याने अनेक हिट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेता ‘गदर २’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सनीचा प्रत्येक चाहता अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या सनी अमहदनगर याठिकाणी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अशात अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील अभिनेत्याचं कौतुक कराल. मॉर्निंग वॉक दरम्यान सनीने बैलगाडीतून येणाऱ्या शेतकऱ्याची भेट घेतली आहे. या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये सनीला पाहून शेतकरी हैराण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. सध्या व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. सनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक शेतकरी बैलगाडीतून येताना दिसत आहे. तेव्हा सनी आणि त्याच्यासोबत असलेल्या काही व्यक्तींनी शेतकऱ्याला थांबण्यासाठी सांगितलं. त्यानंतर सनीने शेतकऱ्यासोबत गप्पा मारायला लगला.
पु्ढे शेतकरी अभिनेत्याला म्हणाला, ‘तू सनी देओल सारखाचं दिसत आहेत.’ त्यानंतर अभिनेता म्हणाला, ‘सनी देओलच आहे…’ सनीला समोर पाहून शेतकरी हैराण झाल्याचं चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे. सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सनीच्या व्हिडीओने अनेकांच्या मनात घर केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा आहे.
सनीच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. सनी देओल (sunny Deol) आणि अभिनेत्री अमीषा पटेल (Amisha Patel) यांच्या ‘गदर २’ (Gadar 2) सिनेमाची चर्चा रंगत आहे. ‘गदर’ (gadar) सिनेमा तुफान गाजल्यानंतर चाहते सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतीक्षेत होते. सिनेमात सनी देओल याने तारा सिंग या भूमिकेला न्याय दिला होता, तर अमिषा हिने सकिनाच्या भूमिकेत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनिल शर्मा यांच्या खांद्यावर आहे. गदरच्या पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागात दोखील आयकॉनिक सीन्स प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. एवढंच नाही तर, सिनेमात “उड जा काले कावा” हे गाणं देखील असणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे.