Gadar 2 साठी सनी देओल सज्ज; सिनेमातील नवीन लूक शेअर करत अभिनेता म्हणाला…
सनी देओल याच्या नव्या लूकची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा, अभिनेत्याचा नवीन लूक पाहून चाहते म्हणले, 'हिंदुस्तान जिंदाबाद...' सध्या सर्वत्र सनी देओलच्या नव्या लूकची चर्चा
मुंबई : बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याने अनेक हिट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेता ‘गदर २’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सनीचा प्रत्येक चाहता अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. आजही ‘गदर’ सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहतात. दरम्यान प्रेक्षक ‘गरद २’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर सिनेमाच्या यशानंतर ‘गदर २’ सिनेमाच्या चर्चा आता रंगत आहेत. दिग्दर्शक अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गरद २’ सिनेमाची सध्या तुफान चर्चा रंगत आहे. आता देखील सनीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘रिफ्लेक्शन’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गदर २ सिनेमातील सनीने नवीन लूक शेअर केल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहे. एक नेटकरी सनीच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘हिंदुस्तान जिंदाबाद, मी गदर २ सिनेमासाठी उत्साही आहे… सर तुम्हाला प्रेम..’ एक अन्य नेटकरी म्हणाला, ‘सर्वात धाकड आणि उत्तम अभिनेता धर्मजी आणि तू आहेस… बाकी इंडस्ट्री तुमच्यासमोर फेल आहे…’
View this post on Instagram
सध्या सर्वत्र सनी देओल याच्या गदर २ सिनेमाची चर्चा रंगत आहेत. सनी देओल (sunny Deol) आणि अभिनेत्री अमीषा पटेल (Amisha Patel) यांच्या ‘गदर २’ (Gadar 2) सिनेमाची चर्चा रंगत आहे. ‘गदर’ (gadar) सिनेमा तुफान गाजल्यानंतर चाहते सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतीक्षेत होते. सिनेमात सनी देओल याने तारा सिंग या भूमिकेला न्याय दिला होता, तर अमिषा हिने सकिनाच्या भूमिकेत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनिल शर्मा यांच्या खांद्यावर आहे. गदरच्या पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागात दोखील आयकॉनिक सीन्स प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. एवढंच नाही तर, सिनेमात “उड जा काले कावा” हे गाणं देखील असणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे.
सनी सध्या आगामी सिनेमाबद्दल नवीन अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो. ‘गदर’ सिनेमाच्या यशानंतर २०२२ मध्ये सिनेमाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली. घोषणेनंतरच प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गदर सिनेमात सनी देओलचे अनेक वेगळे अंदाज चाहत्यांच्या भेटीस आले. अनेक ऍक्शन सीनने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता ‘गदर २’सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.