मुंबई : दिग्गज अभिनेता आणि खासदार सनी देओल यांच्या मुलाचं १८ जून रोजी मोठ्या थाटात लग्न झालं. देओल कुटुंबातील मुलाच्या लग्नात अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सनी देओल यांचा मुलगा करण देओल याने गर्लफ्रेंड द्रिशा आचार्य हिच्यासोबत लग्न केलं. लग्नसोहळ्यात आणि रिसेप्शन पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण करण देओल याच्या लग्नात किंवा लग्नापूर्वीच्या विधींमध्ये धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आणि सनी देओल यांच्या सावत्र आई हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली दिसल्या नाहीत. याच कारणामुळे चर्चांना उधाण आलं आहे..
धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. विवाहित असताना देखील धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. धर्मेंद्र यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यामुळे हेमा मालिनी यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. पण आजही हेमा मालिनी तडजोड करत आयुष्य जगत आहेत..
१९८० मध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीच्या सासू – सासऱ्यांनी हेमा मालिनी यांना घराची पायरी देखील चढू दिली नव्हती… अशा अनेक चर्चा रंगल्या. ४३ वर्षांनंतर देखील धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केलेला नाही. शिवाय सनी देओल आणि हेमा मालिनी यांच्यामध्ये देखील वाद आहेत. याच कारणामुळे करण देओल याच्या लग्नात हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नव्हत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर कधीही सवतीच्या घराची पायरी चढल्या नाहीत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ असल्याच्या नात्याने सनीने ईशा आणि आहना यांना लग्नात बोलावलं होतं. काही वेळासाठी दोघी त्यांच्या पतीसोबत येतील अशा चर्चा रंगल्या होत्या. पण देघीही लग्नात दिसल्या नाहीत.
धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी १९५४ साली १९ वर्षीय प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं होतं. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुलं आहे. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजीता देओल अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.. वयाच्या २५ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज देओल कुटुंब हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कुटुंबापैकी एक आहे.