Sunny Deol | ‘ते भांडणच बालिश’; शाहरुखसोबतच्या वादाबद्दल अखेर सनी देओलने सोडलं मौन

'डर' या चित्रपटाच्या सेटवर झालेल्या वादानंतर शाहरुख आणि सनी देओल हे जवळपास 16 वर्षांपर्यंत एकमेकांशी बोलले नव्हते. या वादावर अखेर सनी देओलने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो शाहरुखसोबतच्या वादावर मोकळेपणे व्यक्त झाला.

Sunny Deol | 'ते भांडणच बालिश'; शाहरुखसोबतच्या वादाबद्दल अखेर सनी देओलने सोडलं मौन
Sunny Deol and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 1:09 PM

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या यश चोप्रा यांच्या ‘डर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यात वाद झाला. त्यानंतर तब्बल 16 वर्षे दोघांनी एकमेकांशी अबोला धरला होता. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि सनी देओलमधील भांडण मांडलं. ‘गदर 2’च्या पार्टीत अखेर शाहरुख आणि सनी देओलने एकमेकांना मिठी मारली आणि त्यानंतर दोघांमधील कटुता कायमची दूर झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओल शाहरुखसोबतच्या भांडणाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. हे भांडण खूपच बालिश होतं, असं तो म्हणाला.

“ते भांडणं बालिश होतं”

सनी देओलने रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी तो म्हणाला, “एक वेळ अशी येतेच की जेव्हा तुम्ही घडलेलं सगळं काही विसरता आणि ते घडायला पाहिजेच नव्हतं असं तुम्हाला जाणवतं. कारण ते सर्व बालिश असतं. अर्थातच त्या वादानंतर मी आणि शाहरुख अनेकदा भेटलो. आम्ही चित्रपटांबद्दल बोलायचो. त्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत मिळून माझा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्याने मला फोनसुद्धा केला होता. त्यामुळे आता सगळं काही ठीक आहे. उत्तम आहे.”

नेमका वाद काय होता?

डर या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सनी देओल त्याच्या भूमिकेविषयी नाखुश होता. शाहरुख खानने चित्रपटात साकारलेल्या राहुल मेहराच्या भूमिकेला अधिक महत्त्व दिलं गेलं, असं त्याला वाटलं होतं. सनी देओलच्या भूमिकेपेक्षा शाहरुखचीच भूमिका वरचढ ठरली होती. याबद्दल सनी देओलने एका मुलाखतीत सांगितलं, “मी यश चोप्रा यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो की मी चित्रपटात कमांडो ऑफिसरची भूमिका साकारतोय. शारीरिकदृष्ट्या ती भूमिका फार सक्षम होती. मग हा मुलगा मला कसा काय हरवू शकतो, असा सवाल मी त्यांना केला. त्यावेळी मी इतका चिडलो होतो की माझ्याच हाताने माझी पँट फाडल्याचं मला लक्षात आलं नाही.” या चित्रपटानंतर जवळपास 16 वर्षे सनी देओल आणि शाहरुख खान एकमेकांशी बोलले नव्हते.

हे सुद्धा वाचा

‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा शाहरुखने सनी देओलला शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला, तेव्हा दोघांमधील वाद मिटला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 512.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी सनी देओलच्या या चित्रपटाचं जोरदार कौतुक केलं.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.