सावत्र बहिणींसोबतच्या नात्याबद्दल सनी देओलने सोडलं मौन; म्हणाला “हे कोणीच बदलू..”

अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल यांनी नुकतीच कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी दोघं भावंडं विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. सावत्र बहिणींसोबत आपलं नातं कसं आहे, याविषयीही सनी देओल मोकळेपणे व्यक्त झाला.

सावत्र बहिणींसोबतच्या नात्याबद्दल सनी देओलने सोडलं मौन; म्हणाला हे कोणीच बदलू..
ईशा देओल, सनी आणि बॉब देओलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 1:39 PM

मुंबई : 2 नोव्हेंबर 2023 | ‘कॉफी विथ करण 8’चा दुसरा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघं भावंडं पाहुणे म्हणून उपस्थित झाले आहेत. सूत्रसंचालक करण जोहरने या दोघांना बरेच प्रश्न विचारले. बॉलिवूड इंडस्ट्रीपासून ते खासगी आयुष्यापर्यंत.. विविध मुद्द्यांवर सनी आणि बॉबी देओल व्यक्त झाले. यावेळी सनी देओलने त्याच्या सावत्र बहिणी ईशा आणि अहाना देओल यांच्यासोबतच्या नात्याविषयीही प्रतिक्रिया दिली. त्याचसोबत बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे खरे असतात का, या प्रश्नावरही सनी देओलने त्याचं रोखठोक मत मांडलं. सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग ईशा देओलने आयोजित केलं होतं. तेव्हा बऱ्याच वर्षांनंतर सनी, बॉबी आणि ईशा कॅमेरासमोर एकत्र आलेले दिसले होते.

देओल कुटुंबीयांनी ‘गदर 2’ या चित्रपटाचं यश कशा पद्धतीने साजरा केला याविषयी सांगताना बॉबी म्हणाला, “हे सर्व करणच्या लग्नापासून सुरू झालं होतं. आम्ही कधीच संपूर्ण कुटुंबीयांसोबत अशा पद्धतीने कॅमेरासमोर आलो नव्हतो. आम्ही सर्वजण लाजरे आहोत. पण लग्नात आलेल्या पाहुण्यांना आम्ही व्हिडीओ शूट करण्यापासून रोखू शकलो नाही. त्या व्हिडीओंमुळेही आमच्यावर प्रेमाचा वर्षाव झाला. आम्ही खऱ्या आयुष्यात कसे आहोत, ते लोकांनी पाहिलं. मला असं वाटतं की दिशा या घरासाठी लकी ठरली आहे. करणच्या लग्नात भावाने खूप डान्स केला होता. मी त्याला इतकं नाचताना कधीच पाहिलं नव्हतं. त्यानंतर गदर 2 च्या निमित्ताने आनंद आला.”

यावेळी सावत्र बहिणी ईशा आणि अहाना देओल यांच्यासोबतच्या नात्याविषयी सनी देओल म्हणाला, “त्या दोघी माझ्या बहिणी आहेत. जे आहे ते सर्व हेच आहे आणि त्याला कोणीच बदलू शकत नाही. त्या दोघीसुद्धा खूप खुश होत्या. या सर्व गोष्टींदरम्यान सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे माझा चित्रपट यशस्वी ठरला. त्यामुळे मीसुद्धा खूप खुश आहे.”

हे सुद्धा वाचा

सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाचं यश संपूर्ण इंडस्ट्रीत साजरा केला गेला. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि सनी देओलची सावत्र आई हेमा मालिनी यांनीसुद्धा या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर ईशा देओलनेही ‘गदर 2’च्या धडाकेबाज यशावर आनंद व्यक्त केला होता. ईशाने खास भाऊ सनी देओलसाठी ‘गदर 2’च्या स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. यावेळी बऱ्याच वर्षांनंतर तिघे भावंडं एकत्र दिसले होते. ईशाने सनी देओल आणि बॉबी देओलसोबत फोटोसुद्धा क्लिक केले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.