Gadar 2 | ‘फिर होगी प्यार की बरसात..’, गदर २ सिनेमातील ‘उड जा काले कावा’ गाणं प्रदर्शित
'गदर २' सिनेमातील ‘उड जा काले कावा’ गाण्याला चाहत्यांनी घेतलं डोक्यावर... गाणं ऐकून तुम्ही पुन्हा पडाल प्रेमात... सध्या सर्वत्र ‘उड जा काले कावा’ गाण्याची चर्चा...
मुंबई | अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा ‘गदर’ सिनेमामुळे चर्चत आले आहेत. अनेक वर्षांनंतर ‘गदर’ सिनेमाचा दुसरा भाग ‘गदर २’ चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र ‘गरद २’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. ‘गदर’ सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता दुसऱ्या भागाची चर्चा सुरु आहे.. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर सर्वत्र ‘गदर २’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. सिनेमाची चर्चा सुरु असताना ‘गदर’ सिनेमातील लोकप्रिय गाणं ‘उड जा काले कावा’ गाणं प्रदर्शित झालं आहे. अभिनेते सनी देओल यांनी गाणं इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. सध्या सर्वत्र ‘उड जा काले कावा’ गाण्याची चर्चा सुरु आहे. नुकताच गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे…
गाण्यातील अमिषा पटेल आणि सनी देओल यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. ‘उड जा काले कावा’ गाणं सोशल मीडियावर पोस्ट करत सनी देओल यांनी कॅप्शनमध्ये, ‘फिर होगी प्यार की बरसात… ‘उड जा काले कावा’ के साथ…’ असं लिहिलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्याने अमिषा पटेल हिला देखील टॅग गेलं आहे… सध्या सर्वत्र ‘गदर २’ सिनेमातील ‘उड जा काले कावा’गाण्याची चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझर देखील चाहत्यांना प्रचंड आवडला. टीझर,‘उड जा काले कावा’ गाण्यानंतर चाहते ट्रेलर आणि सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल ‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘गदर २’मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. सनी देओलच्या मुलाची भूमिका अभिनेता उत्कर्ष साकारणार आहे.
शूटिंगसाठी लखनऊ आणि महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पाकिस्तानप्रमाणे सेट तयार करण्यात आला. गदर २ मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये तब्बल 50 दिवस शूटिंग करण्यात आली.
आजही ‘गदर’ सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहतात. दरम्यान प्रेक्षक ‘गरद २’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर सिनेमाच्या यशानंतर ‘गदर २’ सिनेमाच्या चर्चा आता रंगत आहेत.