Sunny Deol | ‘किस बात का घमंड…’, सनी देओल यांची वागणूक पाहून व्यक्त कराल संताप

चाहत्यांमध्ये सनी देओल यांची क्रेझ, पण चाहत्यांसोबत अभिनेत्याची चुकीची वागणूक! व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील व्यक्त कराला संताप... सध्या सर्वत्र सनी देओल यांची चर्चा...

Sunny Deol | 'किस बात का घमंड...', सनी देओल यांची वागणूक पाहून व्यक्त कराल संताप
Sunny Deol Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 11:23 AM

मुंबई | 13 ऑगस्ट 2023 :भिनेते सनी देओल सध्या ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. आज सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर ‘गरद २’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चाहते देखील गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांच्या प्रतीक्षेत होते. पण आता मात्र चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. सोशल मीडियावर देखील ‘गदर २’ सिनेमाचा बोलबाला आहे. सध्या सर्वत्र ‘गदर २’ सिनेमाची चर्चा सुरु असताना सनी देओल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘गदर २’ सिनेमामुळे सध्या चाहत्यांमध्ये सनी देओल यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. पण चाहत्यांसोबत अभिनेत्याची चुकीची वागणूक चर्चेचा विषय ठरत आहे.

नुकताच, सनी देओल यांनी तारा सिंग याच्या लूकमध्ये स्पॉट करण्यात आलं. तेव्हा सनी देओल यांनी अनेक चाहत्यांसोबत फोटो देखील काढले. पण जेव्हा एक व्यक्ती त्यांना हात मिळवण्यासाठी पुढे आला तेव्हा, मात्र सनी देओल यांनी नकार दिला. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते कमेंट करत सनी देओल यांना ट्रोल करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘मी सिनेमा पाहण्यासाठी जाणार नाही.. यांचा ऍटिट्यूड मला माहिती आहे.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘कोणत्या गोष्टीचा इतका घमंड’, आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘सध्या साथीचे आजार सुरु आहेत म्हणून त्यांनी सावधानी बाळगली आहे…’ सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगत आहे.

‘गदर २’ सिनेमाच्या दोन दिवसांची कमाई पहिल्या दिवशी ‘गदर २’ सिनेमाने तब्बल ४० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता. दुसऱ्या दिवशी देखील सनी देओल यांच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली आहे. सध्या सर्वत्र गदर २ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तब्बल ४३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाची दोन दिवसांची कमाई पाहता रविवारी ‘गदर २’ सिनेमा १०० कोटी रुपयांचा गल्ला पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सनी देओल यांच्या गदर २ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल चाहत्यांच्या भेटीस आला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ११ ऑगस्ट रोजी सनी देओल यांच्या ‘गदर २’ सिनेमासोबत, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.