Sunny Deol | मुलाच्या लग्नात पाहुण्यांवर भडकला सनी देओल; रागाच्या भरात म्हणाले “लाज नाही वाटत का?”

अभिनेता सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने जून महिन्यात लग्नगाठ बांधली. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. सनी देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करणच्या लग्नातील एक किस्सा सांगितला.

Sunny Deol | मुलाच्या लग्नात पाहुण्यांवर भडकला सनी देओल; रागाच्या भरात म्हणाले लाज नाही वाटत का?
सनी देओल, करण देओल आणि दृशा आचार्यImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 2:01 PM

मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीतील देओल कुटुंबीय हे त्यांच्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र त्याचसोबत त्यांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियावर काही पोस्ट करणं विशेष आवडत नाही. म्हणूनच सनी देओलच्या मोठ्या मुलाचं जेव्हा लग्न झालं, तेव्हा सोशल मीडियावर कुटुंबीयांनी मोजकेच फोटो पोस्ट केले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने मुलगा करणच्या लग्नातील एक किस्सा सांगितला. लग्नात सनी देओल काही पाहुण्यांवर भडकला होता. “तुम्हाला लाज नाही वाटत का”, असा थेट सवाल त्याने पाहुण्यांना केला होता. खुद्द सनी देओलने याविषयीचा खुलासा केला आहे.

रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात सनी देओलने करणच्या लग्नातील हा किस्सा सांगितला. “घरात लग्नाचा माहौल होता. बरेच पाहुणे आमच्या घरी राहायला आले होते. तेव्हा मी पाहिलं की त्यापैकी बरेच पाहुणे कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ शूट करून ते सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. हे सर्व पाहून मला खूप राग आला. मी अनेकांना फटकारलं. असं करताना तुम्हाला लाज नाही वाटत का, असं मी त्यांना म्हणालो. थोड्या वेळानंतर मी पाहिलं की सर्वच जण आपापल्या फोनवर कार्यक्रमाचे व्हिडीओ रेकॉर्ड करत आहेत. जेव्हा मला समजलं की मी आता प्रत्येकाला रोखू शकत नाही, तेव्हा मी शांत बसलो. प्रत्येकाकडे जाऊन मी त्यांना थांबवू शकत नव्हतो”, असं त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Karan Deol (@imkarandeol)

सोशल मीडियाविषयी सनी देओल पुढे म्हणाला, “जेव्हापासून सोशल मीडिया आला आहे, तेव्हापासून रिकामटेकड्या लोकांच्या हाती एक साधन आलं आहे. त्यांची काही ओळख तर नसतेच, ना त्यांचा चेहरा दिसतो. त्यामुळे त्यांना जे करायचं असेल ते करतात. कोणाला काहीही बोलतात. ज्या व्यक्तीबद्दल आपण इतकं वाईट बोलतोय, त्याला किती दु:ख होईल याचा विचार ते करत नाहीत. ते फक्त स्वत:चा विचार करतात. स्वत:ला गंमत वाटावी म्हणून काहीही लिहितात.”

सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल याने 18 जून 2023 रोजी गर्लफ्रेंड दृशा आचार्यशी लग्नगाठ बांधली. या लग्नाला देओल कुटुंबीय आणि मोजकेच पाहुणे उपस्थित होते. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली या लग्नाला अनुपस्थित होत्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.